शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयाभोवती पाणी झाल्याने 'त्या' संशयित चोराचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालात स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 16:12 IST

नशेच्या धुंदीत घरात घुसलेल्या चोराला नागरिकांनी बांधून ठेवलेले असताना त्याचा मृत्यू झाला होता

ठळक मुद्देसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पिंपरी : घरात चोरी करण्यासाठी चोर आला असल्याच्या संशयावरून नागरिकांनी एकाला बांधून ठेवले. त्यामुळे घाबरल्याने त्याच्या हृदयाभोवती पाणी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. भोसरी येथे फुगे माने तालीम जवळ मंगळवारी (दि. १८) पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली.नारायण विठोबा फुगे (वय ६०), गणेश विठोबा फुगे (वय ३२), कुणाल विठोबा फुगे (वय २८, सर्व रा. फुगे माने तालीम जवळ, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १८) फिर्याद दिली. शंकर महादेव हौसे (वय ३६, रा. समर्थनगर, दिघी. मूळ रा. चिंचोली, ता. केज, जि. बीड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास शंकर हौसे हा आरोपी यांच्या घरात आला. आरोपी यांनी त्याला चोर समजून त्याला खोलीत पकडून ठेवले आणि तो पळून जाऊ नये म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बांधून ठेवले.घाबरलेला संशयित चोर बांधून ठेवलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर आले. शंकर याच्या हृदयाभोवती पाणी झाले. त्याचा दाब पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. यावरून तीन जणांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. नारायण विठोबा फुगे (वय ६०) यांनी याच्या परस्पर विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर महादेव हौसे (वय ३६) याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. फुगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास आरोपी शंकर हौसे हा फिर्यादी यांच्या घराच्या भिंतीवरून उडी मारून दरवाजा उघडून चोरी करण्याच्या उद्देशाने घरात आला. आरोपी हौसे याने घरातील साहित्याची आदळआपट करून नुकसान करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याला बांधून ठेवले. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोरDeathमृत्यू