विजेचा धक्का लागून ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू; देहूगाव येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 21:55 IST2021-05-22T21:55:25+5:302021-05-22T21:55:36+5:30
शनिवारी (दि. २२ ) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या ही घटना सुमारास घडली.

विजेचा धक्का लागून ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू; देहूगाव येथील घटना
देहूगावः येथील तळवडे देहूगाव बाह्यवळण मार्गावरील औद्योगिक क्षेत्रात विद्युत विभागाच्या मिनी बॉक्स (डीपी) मध्ये काम करणाऱ्या एका खासगी ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. २२ ) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
संजय बापूसाहेब हगवणे (वय ४२,रा. विठ्ठलनगर देहूगाव ता.हवेली,पुणे) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सदर कर्मचाऱ्यास तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
सदर कर्मचाऱ्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.