पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने ठोकरल्याने मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: September 21, 2023 18:12 IST2023-09-21T18:11:59+5:302023-09-21T18:12:43+5:30
मोशी येथे मंगळवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला...

पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने ठोकरल्याने मृत्यू
पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. पुणे-नाशिक महामार्गावर नागेश्वर शाळेजवळ मोशी येथे मंगळवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला.
मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. याप्रकरणी वाहन चालक आरिफ अब्दुल रहेमान तांबोळी (५०, रा. कोंढवा, पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सहायक फौजदार दीपक रणसोर यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालक आरिफ याने त्याच्या ताब्यातील चारचाकी भरधाव चालवली. त्यावेळी मोशी येथील नागेश्वर विद्यालयाजवळ रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचारी व्यक्तीला आरिफ याच्या वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक नामदेव अंगज तपास करीत आहेत.