शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

पिंपरीत आरक्षणांची उत्सुकता; अनेकांचे पत्ते झाले कट, विद्यमान येणार समोरासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 15:40 IST

अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) साठीचे आरक्षण काढण्यात आले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली. अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) साठीचे आरक्षण काढण्यात आले. सोडतीवेळी आरक्षणांची उत्सुकता दिसून आली तर अनेक विद्यमानांचे पत्ते झाले कट तर विद्यमान येणार समोरासमोर येणार आहेत.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ११ वाजता शाळेतील मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. यंदाची निवडणूक ही तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार आहे. त्यामुळे १३९ वॉर्डाचे ४७ प्रभाग तयार झाले आहेत. त्यातील ४७ वा प्रभाग हा चार सदस्यांचा आहे. प्रभांगासाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलागटासाठीचे आरक्षण काढण्यात आले. यात ७० महिलांचे आरक्षण काढण्यात आले.

आरक्षण सोडतीवेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, उपायुक्त विठ्ठल जोशी, सचिन ढोले, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर उपस्थित होते. तर सुरूवातीला प्रक्रियेची माहिती देण्यात आली.

शालेय मुलाच्या हस्ते ड्रममधील चिठ्ठी

नाट्यगृहातील व्यासपीठावर मध्यभागी आरक्षीत प्रभागांच्या चिठ्ठी असलेला फलक लावण्यात आला. त्याच समोर मध्यभागी एक फिरता पारदर्शवक ड्रम ठेवण्यात आला होता. त्यात आरक्षणानुसार चिठ्ठी घेऊन त्यांची घडी करून त्यास पिवळ्या रंगाचे रबर लावण्यात येत होते. त्यानंतर ती चिठ्ठी ड्रम मध्ये टाकण्यात येत होती. हा पारदर्शक ड्रम गोल फिरविण्यात येत होता. त्यानंतर एका शालेय मुलाच्या हस्ते ड्रममधील चिठ्ठी काढून ती चिठ्ठी ध्वनी वर्धकावर वाचली जात होती.

अशी निघाली सोडत

सुरूवातीला अनुसुचित जातीसाठी आरक्षीत असणाऱ्या २२ पैकी ११ जागांचे महिला आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर अनुसुचित जमाती साठी आरक्षीत असणाऱ्या ३ पैकी एका जागेचे थेट पद्धतीन महिला आणि एक आरक्षण पद्धतीने आरक्षण काढण्यात. त्यानंतर खुल्या गटातील महिलांचे आरक्षण काढण्यात आले. खुल्या गटासाठी असणाऱ्या ११४ पैकी  ५७ पैकी ४५ जागा निवडणूकीच्या सूत्रानुसार थेट पद्धतीने खुल्या करण्यात आल्या. तसेच खुल्या प्रवर्गासाठी २३ पैकी १२ चिठ्या या सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या टाकण्यात आल्या.  उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्या.

सोडतीस प्रचंड गर्दी, उत्सुकता

महापालिका निवडणूक आरक्षण सोडत झाली. सकाळी अकरा ही सोडतीची वेळ होती. त्यापूर्वी सकाळी साडेदहापासूनच नागरिक सभाग्रहात येत होते. याठिकाणी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तपासणी करून नागरिकांना सोडण्यात येत होते. यावेळी सभागृहात इच्छुकांसह, विविध पक्षांचे नेते, नगरसेवक, माजी नगरसेवक यांची गर्दी झाली होती. सभागृहात उजव्या बाजूला एलईडी स्कीन लावण्यात आला होता. तसेच सभागृहाच्या बाहेर पार्किंगमध्येही एलएडी स्क्रीन आणि नागरिकांना आरक्षण सोडत पाहता येईल. अशी व्यवस्था केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, स्थायी समितीचे माजी अध्यक्षा  सीमा सावळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आदी उपस्थित होते. मारूती भापकर आणि विनायक रणसुभे यांनी प्रक्रिया सुरू असताना प्रश्न विचारले.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे  

प्रभाग क्रमांक १ : तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर (१. महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक २ : चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडी (१. एससी, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ३ झ्र मोशी, बोºहाडेवाडी-जाधववाडी (१. महिला, २. खुला ३. खुला)प्रभाग क्रमांक ४ : मोशी गावठाण-गंधर्वनगरी-डुडूळगाव (१. महिला, २. खुला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ५ : चºहोली-चोविसावाडी-वडमुखवाडी (१. महिला, २. खुला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ६ : दिघी-बोपखेल (१. एसटी, २.महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ७ : भोसरी सॅण्डविक कॉलनी (१. महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ८ : भोसरी गावठाण-गवळीनगर-शितलबाग (१. महिला, २. महिला, ३.खुला)प्रभाग क्रमांक ९ : भोसरी, धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहत (१. महिला, २. खुला, ३. खुला)प्रभाग क्रमांक १० : भोसरी, इंद्रायणीनगर-लांडेवाडी-गव्हाणेवस्ती (१. महिला, २. खुला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ११ : भोसरी, बालाजीनगर-लांडेवाडी-स्पाइन रस्ता (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक १२ : चिखली,घरकुल-नेवाळेवस्ती (१. महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक १३ : चिखली, मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती (१. महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक १४ : निगडी, यमुनानगर (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक १५ : संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर (१. महिला, २. खुला, ३. खुला)प्रभाग क्रमांक १६ : नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर (१. एससी, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक १७ : संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर (१. एससी, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक १८ : मोरवाडी-अजमेरा कॉलनी-गांधीनगर-खराळवाडी (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)

प्रभाग क्रमांक १९ : चिंचवड स्टेशन-मोहननगर-आनंदनगर (१. एससी महिला, २. महिला ३. खुला)प्रभाग क्रमांक २० : काळभोरनगर-रामनगर-अजंठानगर (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक २१ : आकुर्डी गावठाण-दत्तवाडी (१. महिला २. महिला ३. खुला)प्रभाग क्रमांक २२ : निगडी गावठाण-ओटास्किम (१. एससी, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक २३ : निगडी, भक्ती शक्ती-वाहतूकनगरी (१. महिला, २. खुला, ३. खुला)प्रभाग क्रमांक २४ : रावेत-किवळे-मामुर्डी (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक २५ : वाल्हेकरवाडी (१. एससी, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक २६ : चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर (१. महिला, २. खुला, ३. खुला)प्रभाग क्रमांक २७ : उद्योनगर-रामकृष्ण मोरे सभागृह (१. महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक २८ : चिंचवड, केशवनगर-श्रीधरनगर (१. महिला, २. खुला, ३. खुला)प्रभाग क्रमांक २९ : भाटनगर-पिंपरी कॅम्प-मिलिंनदगर (१. एससी, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ३० : पिंपरीगाव-वैभवनगर (१. महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ३१ : काळेवाडी-विजयनगर-नढेनगर (१. महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ३२ : काळेवाडी, तापकीरनगर-ज्योतीबानगर (१. एससी, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ३३ : रहाटणी-तापकीरनगर (१. महिला, २. खुला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ३४ : थेरगाव, बापुजीबुवानगर-शिवतीर्थनगर (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ३५ : थेरगाव, बेलठिकानगर-पडवळनगर-पवारनगर (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ३६ : थेरगाव, गणेशनगर-संतोषनगर-पद्मजी पेपर मिल (१. महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ३७ : ताथवडे-पुनावळे (१. एससी महिला, २. महिलाला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ३८ : वाकड (१. एससी, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ३९ : पिंपळेनिलख-वाकड (१. एससी, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ४० : पिंपळेसौदागर (१. महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ४१ : पिंपळेगुरव गावठाण-वैदुवस्ती-जवळकरनगर (१. एससी महिला, २. एसटी महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ४२ : कासारवाडी-फुगेवाडी (१. महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ४३ : दापोडी (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ४४ : पिंपळेगुरव-काशिदनगर-मोरया पार्क (१. एससी, २. एसटी महिला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ४५ : नवी सांगवी (१. महिला, २. खुला, ३. खुला)प्रभाग क्रमांक ४६ : जुनी सांगवी (१. एससी, २. महिला, ३. महिला, खुला)

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकreservationआरक्षणWomenमहिला