शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलीच्या मृत्यूस जबाबदार डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 14:16 IST

हिंजवडी परिसरात एका प्रसिध्द डॉक्टरने १३ वर्षीय मुलीला चुकीच्या पध्दतीने इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यू झाला, असा नातेवाइकांनी आरोप केला होता.

ठळक मुद्देचुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने जंतूंप्रादूर्भाव होऊन मुलीचा मृत्यू झाल्याचे निष्षन्न

पिंपरी : हिंजवडी परिसरात एका प्रसिध्द डॉक्टरने १३ वर्षीय मुलीला चुकीच्या पध्दतीने इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यू झाला, असा नातेवाइकांनी आरोप केला होता. त्यानुसार याप्रकरणी ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहवालात डॉक्टर दोषी असल्याचे म्हटले आहे. प्रज्ञा अरुण बोरुडे (वय १३) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार, डॉ. रामकृष्ण जाधव यांच्याविरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०१७ रोजी प्रज्ञा हिला थंडी-ताप येत असल्याने हिंजवडीतील डॉ. रामकृष्ण जाधव यांच्या दवाखान्यात नेण्यात आले होते. यावेळी डॉ. जाधव यांनी तपासणी करून प्रज्ञाला उजव्या कमरेवर इंजेक्शन दिले. त्यानंतर प्रज्ञा घरी गेली मात्र इंजेक्शन दिलेल्या जागी आणि उजव्या मांडीवर, कंबरेवर आणि पाठीवर काळे चट्टे आणि फोड आल्याने तिला तातडीने पुढील उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते मात्र,उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी डॉ. रामकृष्ण जाधव हेच जबाबदार असून त्यांच्याविरोधात मृत मुलीचे वडील अरुण बोरुडे यांनी हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी तपास सुरू ठेवला, मृत मुलींवर झालेल्या उपचारांची सर्व कागदपत्रे पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आली. त्याचा अहवाल गेल्या आठवड्यात हिंजवडी पोलिसांकडे आला. यामध्ये संबंधित डॉ. जाधव यांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा करत चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने जंतूंप्रादूर्भाव होऊन मुलीचा मृत्यू झाल्याचे निष्षन्न झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdoctorडॉक्टर