तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल; आकुर्डीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 21:40 IST2021-06-23T21:40:33+5:302021-06-23T21:40:44+5:30
बदनामीच्या त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल; आकुर्डीतील घटना
पिंपरी : बदनामी केल्याने तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी येथे १८ जूनला सकाळी ही घटना घडली.
अमित रमेश गोसावी (वय २८), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रमेश वसंत गोसावी (वय ५०, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी) यांनी मंगळवारी (दि. २२) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संगमेश्वर गंगाधर येवते (वय ३२), भोनूप्रसाद हंसराज जयस्वाल (वय २९), विश्वजीत मधुकर मेढे (वय ३०), आकाश घाडगे (सर्व रा. आकुर्डी), अशी आरोपींची नावे आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा मुलगा अमित गोसावी याची बदनामी केली. या बदनामीच्या त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अमितने चिठ्ठी लिहून ठेवली. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. आरोपींनी बदनामी केली असून या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे.