खळबळजनक! पिंपरी महापालिकेत नगरसेवकाच्या कार्यकर्त्याने पाणी समजून केले अॅसिडच प्राशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 21:47 IST2021-05-27T21:43:24+5:302021-05-27T21:47:56+5:30
नगरसेवक राजू बनसोडे यांचे कार्यकर्ते एक कार्यकर्ते पाणी समजून अॅसिडच प्यायले आहेत.

खळबळजनक! पिंपरी महापालिकेत नगरसेवकाच्या कार्यकर्त्याने पाणी समजून केले अॅसिडच प्राशन
पिंपरी : महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावर क्रीडा समिती सभापतीच्या दालनात एका नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांने पाणी समजून अॅसिडच प्यायलाचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
नगरसेवक राजू बनसोडे यांचे कार्यकर्ते एक कार्यकर्ते पाणी समजून अॅसिडच प्यायले आहेत. महापालिकेतील क्रीडा समितीच्या सभापतींच्या दालनात बनसोडे यांचे कार्यकर्ते दुपारी बसले होते. एका बॉटेलमध्ये अॅसिड ठेवले होते. पाणी समजून आप्पा गायकवाड यांनी एसिड पिले. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
..........
साफसफाई कर्मचाऱ्याांनी अॅसिडची बॉटल दालनात कशासाठी ठेवली. निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदार व त्यांच्या कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. कंत्राट काढून घ्यावे, अशी मागणी क्रीडा सभापती उत्तम केंदळे व नगरसेवक राजू बनसोडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.