शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

Lakshman Jagtap: नगरसेवक ते आमदार, ३५ हुन अधिक वर्षे राजकारण; अत्यंत कृतिशील व्यक्तिमत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 17:57 IST

राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, व्यापार, कला, उद्योग या क्षेत्रात आपल्या दैदीप्यमान कर्तृत्वाने स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे चिंचवडचे आमदार लक्ष्मण पांडूरंग जगताप

पिंपरी: राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, व्यापार, कला, उद्योग या क्षेत्रात आपल्या दैदीप्यमान कर्तृत्वाने स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे चिंचवडचे आमदार लक्ष्मण पांडूरंग जगताप हे होत. महानगरपालिका, विधान परिषद अशा विविध माध्यमांतून रचनात्मक कार्य करून स्वतःची भाऊ अशी ओळख निर्माण केली होती. ३५ हून अधिक वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या विकासकामांकडे लक्ष वेधल्यास हे व्यक्तिमत्त्व किती कृतिशील आहे, याचे दर्शन घडते.

पिंपळेगुरवच्या शेतकरी कुटुंबात लक्ष्मण यांचा जन्म झाला.  १९८२ मध्ये युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्त्वाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. पवार यांनी १९८४ मध्ये एस काँग्रेसच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढविली. त्या वेळी पवार यांच्या प्रचारात लक्ष्मण जगताप सहभागी झाले होते. पुढे १९८६ मध्ये नगरसेवक झाले. त्यानंतर १९९१ मध्ये अजित पवार बारामती लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले. त्या वेळीही दादांचा प्रचार लक्ष्मण यांनी केला. नगरसेवक पदाच्या काळात पिंपळे गुरव ते दापोडी व पिंपळे गुरव ते कासारवाडी हे पूल जोडण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे १९९२ ते ९७ या काळात दुसऱ्यांदा निवडून आले. स्थायी समितीचे अध्यक्षही झाले. त्यानंतर १९९७ ते २००२ या कालावधीत तिसऱ्यांदा संधी मिळाली. २००२ मध्ये महापौरपदही मिळाले. महापौर पदही गाजविले. पुढे २००२ ते २००७ या कालावधीत चौथ्यांदा नगरसेवकपद मिळाले. याच कालावधीत राष्टÑवादीचे शहराध्यक्षपदीही मिळाले. त्यांनी पक्ष - संघटना मजबूत केली. पुढे  २००४ मध्ये विधान परिषदेवर आमदार झाले. त्यानंतर २००९ मध्ये चिंचवडमधून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये अपक्ष म्हणून खासदारकी लढविली. मात्र, अपयश आल्याने भाजपातून आमदारकी लढवून आमदार झाले. त्यानंतर भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी घेऊन २०१७ मध्ये महापालिकेत भाजपाची एकमुखी सत्ता आणली. त्यानंतर शहराचे नेतृत्व म्हणून कार्यरत होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांनी लौकीक मिळविला. २०१९ च्या निवडणूकीतही चिंचवडमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक आले.

जगताप यांनी काय विकास केला हे सांगवी पिंपळेगुरव परिसर पाहिल्यानंतर दिसते. गावांचा आता चेहरा मोहराचा बदलून गेला आहे. योगमहर्षी रामदेवबाबांचे योग शिबिर सांगवी येथे घेतले. ४० हजारांहून अधिक साधकांनी याचा लाभ घेतला. पवनाथडी जत्रेसारखा महिला बचत गटांचा पिंपरी-चिंचवडमधील उपक्रम सर्वांच्या नजरेत भरण्यासारखा होता. अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी संपूर्ण इमारत बांधकामाची मदत असो, वा एखाद्या गरीब-गरजू विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणासाठी मदत असो, ते सदैव तयार असत. सहकार चळवळीतगणेश सहकारी बँकेच्या माध्यमातून समाजाच्या वित्तीय गरजाही पूर्ण करतात. मिलेनियम स्कूलसारखी उच्च दर्जाची इंग्रजी माध्यमाची शाळादेखील त्यांनी स्थापन केली. उच्च शिक्षणाची आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून देखील येथील शिक्षणाची गरज त्यांनी पूर्ण केली. अत्यंत परखड आणि कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता अशीही ओळख होती.

आमदार लक्ष्मण जगताप राजकीय कारकीर्द

१९८६ ते २००६ सलग २१ वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक.१९९३ अध्यक्ष, स्थायी समिती पिंपरी-चिंचवड महापालिका२००० महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका२००२ अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा)२००४ पुणे जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य (आमदार) पदावर निवड.२००६-२००७ सदस्य, विधान मंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती,२००७-२००८ सदस्य, विधान मंडळ अनुपस्थिती समिती२००८-२००९ सदस्य, विधानमंडळ आश्वासन समिती.२००९ चिंचवड विधानसभा आमदार (अपक्ष)२०१४-चिंचवडचे भाजपाचे आमदार (भाजपा)२०१६-भाजपा शहराध्यक्ष२०१९-चिंचवडचे भाजपा आमदार

सामाजिक, सहकार क्षेत्र  

श्री गणेश सहकारी बँक मर्यादित, नवी सांगवी  अध्यक्षप्रतिभा महिला संगणक प्रशिक्षण केंद्र, पिंपळे गुरव संस्थापक,प्रतिभा महिला संगणक प्रशिक्षण केंद्र, रहाटणी, संस्थापक, भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळे गुरव संस्थापक.विजयराज नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळे गुरव संस्थापक,चंद्रभागा नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळे गुरव संस्थापक.प्रतिभा महिला नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळे गुरव, संस्थापक.विनायक नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळे गुरव, संस्थापक.प्रतिभा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड रिसर्च, संस्थापक,  प्रतिभा कॉलेज आॅफ कॉम्प्युटर सायन्स, संस्थापक अध्यक्ष.  प्रतिभा कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स, संस्थापक अध्यक्ष.न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल, नवी सांगवी , संस्थापक अध्यक्ष.वेणुताई नर्सरी स्कूल, पिंपळे गुरव, संस्थापक,  पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पिंपळे गुरव, आजीवन सदस्य. पिंपरी-चिंचवड सोशल क्लब, कार्याध्यक्ष

टॅग्स :PuneपुणेLakshman Jagtapलक्ष्मण जगतापPoliticsराजकारणMLAआमदार