Coronavirus Pimpri: Reality! No ventilator bed left in the pimpri chinchwad corporation's hospital | Coronavirus Pimpri : भयाण वास्तव! पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयामध्ये नाही एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक

Coronavirus Pimpri : भयाण वास्तव! पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयामध्ये नाही एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक

पिंपरी : कोरोनाच्या गंभीर, अतिगंभीर रूग्णांना आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरच्या खाटांमध्ये वाढ केली जाणार आहे. पुढील दहा दिवसांत जम्बो हॉस्पिटल, आॅटो क्लस्टर आणि महापालिकेच्या रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या ३८० खाटा उपलब्ध होणार आहेत. शहरात महापालिका रूग्णालयात एकही व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नाही, खासगी रुग्णालयात चार खाटा उपलब्ध आहेत, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.  

महापालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये सध्यस्तीतीत  ७४ खाटा असून त्यात वाढ करून २९० खाटांची उपलब्धता केली जाणार आहे. शहरातील कंपन्या सीएसआरअंतर्गत ९० खाटा देणार आहेत. पुढील दहा दिवसांत जम्बो हॉस्पिटल, आॅटो क्लस्टर आणि महापालिकेच्या रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या ३८० खाटा उपलब्ध होणार आहेत. तसेच होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या २० हजार रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आजपासून कॉल सेंटर सेवा  सुरू झाली आहे. याबाबतची माहिती प्रवक्ते शिरीष पोरेडी, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी   दिली.
................
पोरेडी म्हणाले, नेहरूनगर येथील जम्बो हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर खाटांची संख्या ६०  होती. त्यात ४० खाटा वाढविल्या जाणार असून अशा १०० खाटा उपलब्ध होतील. आॅटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या १४ होती. त्यात १६  ने वाढ करून खाटांची संख्या ३० वर नेली जाणार आहे.
..................
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘थेरगाव, जिजामाता, आकुर्डी आणि भोसरी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी ४० याप्रमाणे  व्हेंटिलेटरच्या खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्याचे काम अंतिम टप्यात आहे. त्याचबरोबर शहरातील विविध कंपन्या सीएसआरअंतर्गत महापालिकेला व्हेंटिलेटरच्या ९० खाटा देणार आहेत. पुढील दहा दिवसांत व्हेंटिलेटरच्या ३८०  खाटा उपलब्ध होणार आहेत.’’
................................
एकही व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नाही
महापालिकेची दहा कोविड केअर सेंटर सुरू आहेत. तिथे सौम्य लक्षणे असलेल्या  रुग्णांवर उपचार केले जातात.  दहा सेंटरमध्ये २ हजार १८ खाटा आहेत. त्यातील १७३२ खाटांवर रुग्ण दाखल आहेत. १८६ खाटा शिल्लक आहेत. महापालिका रुग्णालयात आज एकही व्हेंटिलेटरची खाट उपलब्ध नाही. खासगी रुग्णालयात चार खाटा उपलब्ध आहेत.


.

Web Title: Coronavirus Pimpri: Reality! No ventilator bed left in the pimpri chinchwad corporation's hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.