coronavirus: discharged to 3 people who was tested corona positive rsg | coronavirus : आनंदवार्ता ; पिंपरी चिंचवडमधील तीन काेराेनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज

coronavirus : आनंदवार्ता ; पिंपरी चिंचवडमधील तीन काेराेनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी:  पिंपरी चिंचवड शहरातले कोरोनाचे पहिले तीन पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. त्यांना पुढील चांगल्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी महापौर उषा ढोरे ,उपमहापौर तुषार हींगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी पक्षनेते .एकनाथ पवार, जवाहर ढोरे यांनी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ. राजेश .वाबळे सर.डॉ. अनिकेत सोनी व त्याच्या सहकार्यानी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आलेल्या यशाचे कौतुक त्यांनी केले.

चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर देशात ही या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिंपरी -चिंचवड शहरात बारा  मार्चला पहिला रुग्ण सापडला होता. त्यांनतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कडक उपाययोजना केल्या. वैदकीय आणि आरोग्य विभागाचे नियोजन केले. परदेशातून येणाऱ्या आणि आलेल्या नागरिकांवर नजर ठेवली होती. नागरिकांना होम क्वॉरताईन केले होते. त्यांच्यावर 112 टीम लक्ष ठेवून आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये पहिले 3 रुग्ण 11 मार्चला आढळून आले होते. या तिघांनी पुणतील दुबईला गेलेल्या दाम्पत्याबरोबर प्रवास केला होतो. एकाच दिवशी 3 रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. 14 दिवसाचे उपचार केल्या नंतर   बुधवारी 3 रुग्णाचे घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते त्याचे अहवाल गुरुवारी  पहाटे आले.  ते अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत. 

त्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा त्याचे घशातील द्रव्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले. शुक्रवारी पहाटे अहवाल प्राप्त झाला ते निगेटिव्ह आले आहेत. त्यांमुळे त्या तिघांना घरी सोडण्यात आले आहे. 

 

Web Title: coronavirus: discharged to 3 people who was tested corona positive rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.