शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

Coronavirus : पिंपरीत कोरोनाचे आणखी ४१ संशयित ; रुग्णांचे नमुने तपासणीसाठी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 2:48 PM

पुण्यातील एक ट्रॅव्हल कंपनीकडून दुबईला गेलेल्या पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह सापडले..

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आढळलेल्या पाच संशयितांपैकी तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे गुरुवारी समोर आले. त्यानंतर या तिघांच्या संपर्कात आलेल्यांसह आणखी ४१ संशयित रुग्णांची माहिती आरोग्य विभागाने घेतली आहे. वैद्यकीय विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या या रुग्णांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी दिली.पुण्यातील एक ट्रॅव्हल कंपनीकडून दुबईला गेलेल्या पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यानंतर  पिंपरी-चिंचवडमधील याच पथकातील दोघांसह पाच संशयित रुग्ण आढळून आले. त्यांची तपासणी केल्यानंतर तिघांना संसर्ग झाल्याचे गुरुवारी समोर आले. शहरात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने महापालिका यंत्रणा कामाला लागली आहे. या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संशयित म्हणून माहिती घेण्यात येत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरातील आणखी ४१ जणांचे संशयित म्हणून नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेत पाठविण्यात आले आहेत. या रुग्णांच्या नमुने तपासणीनंतर प्राप्त होणाºया अहवालानंतरच त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे. याशिवाय आणखी विदेशातून परतलेल्या नागरिकांना घरातच राहून दक्षता घेण्यासाठी म्हणजेच होम क्वारंनटाईन केल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले................परदेशवारी केलेल्या २३१ जणांना होम क्वारंटाईनचा सल्ला४पिंपरी-चिंचवड शहरामध्ये २३१ जणांनी महिन्याभरात परदेशवारी केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. तपासणी पथकांच्या माध्यमातून परदेशवारी केलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. असे परदेशवारी करून आलेले दोन जर्मनीतून आलेले नागरिक तपासणी पथकाच्या माध्यमातून समोर आले. याची तपासणी पूर्ण केल्यानंतर त्यांना कोणताही त्रास नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला असल्याचे डॉ. शंकर जाधव यांनी सांगितले. मात्र, यांची वेळोवेळी पालिकेचे तपासणी पथक देखरेख करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या वायसीएममध्ये असलेल्या कोरोना संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांना येथे हलविण्यात आले आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे. सध्या भोसरी येथील कक्षात १० जणांना दाखल करण्यातआले आहे. ........

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर