पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आढळलेल्या पाच संशयितांपैकी तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे गुरुवारी समोर आले. त्यानंतर या तिघांच्या संपर्कात आलेल्यांसह आणखी ४१ संशयित रुग्णांची माहिती आरोग्य विभागाने घेतली आहे. वैद्यकीय विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या या रुग्णांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी दिली.पुण्यातील एक ट्रॅव्हल कंपनीकडून दुबईला गेलेल्या पती-पत्नी कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील याच पथकातील दोघांसह पाच संशयित रुग्ण आढळून आले. त्यांची तपासणी केल्यानंतर तिघांना संसर्ग झाल्याचे गुरुवारी समोर आले. शहरात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने महापालिका यंत्रणा कामाला लागली आहे. या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संशयित म्हणून माहिती घेण्यात येत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरातील आणखी ४१ जणांचे संशयित म्हणून नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही संस्थेत पाठविण्यात आले आहेत. या रुग्णांच्या नमुने तपासणीनंतर प्राप्त होणाºया अहवालानंतरच त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे. याशिवाय आणखी विदेशातून परतलेल्या नागरिकांना घरातच राहून दक्षता घेण्यासाठी म्हणजेच होम क्वारंनटाईन केल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले................परदेशवारी केलेल्या २३१ जणांना होम क्वारंटाईनचा सल्ला४पिंपरी-चिंचवड शहरामध्ये २३१ जणांनी महिन्याभरात परदेशवारी केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. तपासणी पथकांच्या माध्यमातून परदेशवारी केलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. असे परदेशवारी करून आलेले दोन जर्मनीतून आलेले नागरिक तपासणी पथकाच्या माध्यमातून समोर आले. याची तपासणी पूर्ण केल्यानंतर त्यांना कोणताही त्रास नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला असल्याचे डॉ. शंकर जाधव यांनी सांगितले. मात्र, यांची वेळोवेळी पालिकेचे तपासणी पथक देखरेख करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या वायसीएममध्ये असलेल्या कोरोना संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांना येथे हलविण्यात आले आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे. सध्या भोसरी येथील कक्षात १० जणांना दाखल करण्यातआले आहे. ........
Coronavirus : पिंपरीत कोरोनाचे आणखी ४१ संशयित ; रुग्णांचे नमुने तपासणीसाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 14:52 IST