शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

Corona virus : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील भाजीमंडई बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 15:49 IST

शहरातील सर्व भाजी मंडई, आठवडी बाजार, मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व फळे विक्रीस चार दिवस पूर्णत:प्रतिबंध

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रातील भाजीमंडई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  शहरातील सर्व भाजी मंडई ,आठवडी बाजार, मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व फळे विक्रीस पूर्णत:प्रतिबंध करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवार दिनांक ११ एप्रिल पासून सायंकाळी ६ वाजता पासून मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या भागात पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत, त्या भागात करफ्यू लागू केला आहे. पिंपरीतील खराळवाडी, चिखली घरकुल, दिघी, थेरगाव आणि आता भोसरीचा परिसरही बंद केला आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.कोवीड प्रादूर्भाव आणि व उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र कोवीड १९ उपाययोजना नियम २०२० नुसार एखाद्या भौगोलिक क्षेत्रात उद्रेक, प्रादुर्भाव आढळल्यास आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.पिंपरी-चिंचवड हे शहर विविध गावांचे तयार झाले आहे. त्यामुळे विविध गावांमध्ये भाजीमंडई उभारण्यात आल्या आहेत. या भाजीमंडईमध्ये सध्या प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतूदीनुसार खालील ठिकाणी भाजीपाला व फळे विक्रीसाठी पूर्णता प्रतिबंध करण्यात आला आहे..........................बंद असणारी ठिकाणे

१) भोसरी गावातील लांडगे आळीजवळील भाजीमंडई२) चिखली गावातील भाजीमंडई३)चिंचवड गाव चापेकर चौकातील भाजीमंडई४)आकुर्डी श्री विठ्ठल रूकिम्णी मंदिराजवळील भाजीमंडई५) पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री  भाजीमंडई६) थेरगाव डागे चौकातील भाजीमंडई७)   वाकड गाववाठाणातील भाजीमंडई८)  शहरातील उपनगरात भरणारे सर्व आठवडे बाजार९) पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात फिरणाºया हातगाड्या१०) कृषी उत्पन्न बाजार समिती मोशी११) किरकोळ भाजीपाला व फळेविक्री ......................................११ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६ वाजतापासून मंगळवार दि १४ एप्रिल २०२० रोजी रात्री बारा वाजेपर्यत हे आदेश लागू करण्यात आले आहेत.त्यानुसार या संबंधित परिसरातील पोलीस स्टेशन प्रमुख या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करतील व संपूर्ण शहरात कोणतीही भाजीमंडई किरकोळ भाज्या व फळे विक्री व आठवडे बाजार बंद राहतील याची खबरदारी घेतील असेही आदेशात नमूद केले आहे.....................आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखणे गरजेचे आहे. बंद असतानाही अजूनही भाजीमंउई परिसरात नागरिक गर्दी करीत आहेत. सोशल डिस्टसिंगचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, लॉक डाऊनचे पालन करावे. कोरोनाचे सार्वजनिक संक्रमण रोखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये. सर्दी खोकला किंवा ताप आल्यास दवाखाण्यात जाऊन उपचार घ्यावेत. तसेच हॅडवॉश करावा, साबनाने हात स्वच्छ करावेत. तसेच घराबाहेर पडायचे झाल्यास तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. लॉक डाऊनचे पालन न करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडvegetableभाज्याfruitsफळेbusinessव्यवसायshravan hardikarश्रावण हर्डिकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस