शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णवाढीचा वेग पाहूनच पुन्हा ‘रेडझोन’चा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 9:01 PM

शहरात दोन दिवसांत चाळीस रुग्णांची भर

ठळक मुद्देचौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने नवीन नियमावली केली प्रसिद्धसरकारच्या निर्णयाच्या आधारावर नियमावली तयार केली जाणार

पिंपरी : रुग्णवाढीचा दर कमी झाल्याने राज्य सरकारने पिंपरी-चिंचवडला दोन दिवसांपूर्वी नॉन रेडझोन संबोधले होते. मात्र, दोन दिवसांपासून रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत आढावा घेऊनच रेडझोनबाबत निर्णय घेणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रुग्णवाढीचा वेग पाहून चर्चा केली जाईल. पिंपरी-चिंचवड शहर शुक्रवार मध्यरात्रीपर्यंत रेडझोनमध्येच असून, जुनेच नियम लागू असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यात अधिक असल्याने शेजारचे शहर आणि रुग्णसंख्या कमी असूनही पिंपरी-चिंचवड हे रेडझोनमध्ये संबोधले जात होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये रेडझोन आणि नॉन रेडझोन असे दोनच झोन निश्चित केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णवाढीचा दर जास्त असतानाही शहराला नॉन रेडझोन म्हटले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शहरात दोन दिवसांत चाळीस रुग्णांची भर पडली आहे. रुग्ण वाढताना शहर नॉन रेडझोन कसे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नवीन आदेश शुक्रवारी.....आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील चौथ्या लॉकडऊनच्या नवीन नियमावलीची शुक्रवारपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. दोन दिवसांत रुग्णवाढीचा वेग पाहून नियमावली तयार करणार आहोत. सरकारच्या निर्णयाच्या आधारावर नियमावली तयार केली जाणार आहे. कंटेन्मेंट क्षेत्र महापालिकाच ठरविणार आहे. शुक्रवारपर्यंत शहर रेडझोनमध्येच असणार आहे. या ठिकाणी जुनेच नियम चालू राहतील. त्यानंतर वेगळी नियमावली प्रसिद्ध केली जाईल........................................................................आलेख कमी झाल्याने नॉन रेडझोन संबोधलेआयुक्त हर्डीकर म्हणाले, औद्योगिकनगरीतील रुग्णवाढीचा वेग कमी झाला होता.  त्यामुळे ग्रीन झोन न म्हणता पिंपरी-चिंचवड शहराला 'नॉन रेडझोन' म्हटले आहे. रेडझोन घोषित केले नाही. दोन दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराला नॉन रेडझोन मधून वगळण्याबाबत चर्चा झाली आहे.  शनिवापर्यंत रुग्णवाढीचा दर कमी होता. परिस्थिती नियंत्रणात होती.  मात्र, शहरात पुन्हा रविवारनंतर रुग्णसंख्येत वाढ सुरू झाली. सरकारने त्यापूर्वीच झोन निश्चित केले होते. आनंदनगर झोपडपट्टीत रुग्णसंख्या वाढत असून, आनंदनगर किती लवकर कंटेन्मेंट झोनमधून बाहेर पडेल, त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल. त्यासाठी दोन दिवस काहीच निर्णय घेतला जाणार नाही. पूवीर्चेच आदेश कायम असतील. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस