Corona virus : पिंपरीत बुधवारी वर्षभरातील सर्वाधिक रुग्णवाढ ; १८६५ पॉझिटिव्ह ; ८२४ जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 22:06 IST2021-03-24T22:05:54+5:302021-03-24T22:06:35+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे.

Corona virus : पिंपरीत बुधवारी वर्षभरातील सर्वाधिक रुग्णवाढ ; १८६५ पॉझिटिव्ह ; ८२४ जण कोरोनामुक्त
पिंपरी : महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. दिवसभरात १ हजार ८६५ रुग्ण सापडले असून ८२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पंधरा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ३ हजार ०८८ जणांना डिस्चार्ज दिला आहे. भोसरी, चिंचवड आणि सांगवीत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. पंधराशे पर्यंत गेलेली संख्या अकराशे पर्यंत खाली आली होती. मात्र, दोन दिवसापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ४ हजार १३३ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ८९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ३६६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या २ हजार ०५४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ३ हजार ०८८ जणांना डिस्चार्ज दिला आहे.
............................
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज ८२४ जण कोरोनामु्कत झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख १२ हजार ४० वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार ९९६ वर गेली आहे.
..................................
दहा जणांचा बळी
कोरोनामुळे मृतांची संख्याही वाढत आहे. शहरातील दहा आणि शहराबाहेरील पाच अशा एकूण पंधरा जणांचा बळी घेतला आहे. त्यात शहरातील सात पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे मृतांची संख्या १ हजार ९४३ वर पोहोचली आहे.
......................
साडेचार हजार जणांचे लसीकरण
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढत आहे. शहरातील महापालिकेच्या ११ आणि खासगी १२ अशा केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात आज ३ हजार ६४९ जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह ४ हजार ६८५ जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १ लाख ६ हजार २७ वर पोहोचली आहे.