Corona Virus : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ओलांडला ४० हजारांचा टप्पा; दिवसभरात १०३९ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 23:46 IST2020-08-22T23:46:20+5:302020-08-22T23:46:47+5:30
पिंपरी शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४०८९८ झाली.

Corona Virus : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ओलांडला ४० हजारांचा टप्पा; दिवसभरात १०३९ नवे रुग्ण
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, शनिवारी दिवसभरात १०३९ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४०८९८ झाली. दिवसभरात ९४६ जण कोरोनामुक्त झाले. तर ४०२५ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ३५८० जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात शनिवारी दिवसभरात १३ जण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील दोघांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ७७१ तर महापालिका हद्दीबाहेरील १५२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच २३२७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ३९४८ जणांना घरी सोडण्यात आले. तर ७०४२ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ५९४ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील १५६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील २७१६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ९९ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.
शहरात आज मृत झालेले रुग्णांमध्ये नेहरुनगर येथील ६८ वर्षीय महिला, पिंपरीतील संत तुकारामनगर येथील ८९ वर्षीय पुरूष व ७५ वर्षीय महिला, चिखलीतील मोरेवस्ती येथील ७२ वर्षीय पुरूष, पुनावळे येथील ४० वर्षीय पुरुष, चिंचवड येथील ७३ वर्षीय पुरुष, रहाटणी येथील ६० वर्षीय पुरुष, दापोडी येथील ५० वर्षीय पुरुष, वाल्हेकरवाडी येथील ६० वर्षीय पुरुष, पिंपळे सौदागर येथील ६५ वर्षीय पुरुष, पिंपरी येथील ३४ वर्षीय महिला, चाकण येथील ६० वर्षीय पुरुष, कोंढवा येथील ४७ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. पुणे महापालिका हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये पिंपळे गुरव येथील ७० वर्षीय पुरुष, ८० वर्षीय महिला व ६७ वर्षीय पुरूष, चिंचवड येथील ८४ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरुष, काळेवाडी फाटा येथील ६३ वर्षीय पुरुष, निगडी येथील ७० वर्षीय पुरुष, दिघी येथील ५२ वर्षीय पुरुष, पिंपळे निलख येथील ६३ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे.