Corona Update: पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांचा उच्चांक; एकाच दिवसात ४ हजार ८७५ बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 19:12 IST2022-01-22T19:12:04+5:302022-01-22T19:12:44+5:30
शनिवारी १२ हजार ९४९ जणांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत...

Corona Update: पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांचा उच्चांक; एकाच दिवसात ४ हजार ८७५ बाधित
पिंपरी: Pimpri Chinchwad Corona Update - पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी कोरोनाच्या नवीन ४ हजार८७५ रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ हजार ५२७ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आले.
शनिवारी १२ हजार ९४९ जणांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत शहरात २५ हजार ८३७ सक्रिय रूग्ण आहेत. त्यापैकी ५८४ रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत. तर २५ हजार २५३ रूग्ण गृहविलगिकरणात उपचार घेत आहेत.
आतापर्यंत शहरात ३ लाख २३ हजार १७४ रूग्णांची नोंद झाली आहे. तर शहराच्या हद्दीतील ४ हजार ५३८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या शहरात ११८ मेजर कन्टेंमेट झोन आहेत, तर ६६६ मायक्रो कन्टेंमेंट झोन आहेत. शनिवारी दिवसभरात ८ हजार ६७९ जणांनी कोरोना प्रतिबंध लस घेतली आहे. शहरात आतापर्यंत ३२ लाख १७ हजार २५४ जणांनी लस घेतली आहे.