पिंपरीत युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात 'विश्वासघात'आंदोलन; घोषणाबाजीने नोंदवला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 15:13 IST2021-02-17T15:11:43+5:302021-02-17T15:13:05+5:30
देशात प्रथमच पेट्रोल किमतीच्या इतिहासात पेट्रोल ची विक्रमीविक्री १०० रूपयांपर्यंत प्रतिलिटर झाली आहे.

पिंपरीत युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात 'विश्वासघात'आंदोलन; घोषणाबाजीने नोंदवला निषेध
पिंपरी : सबके साथ विश्वासघात, अब की बार, बूरे फसे यार, झुठे वादे, झुठी सरकार, केंद्र सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय... यांसारख्या घोषणा देत व डोक्यावर क्रिकेट हेल्मेट व हातात बॅट घेऊन विडंबनात्मक 'सेंच्युरी' सेलिब्रेशन करत पिंपरी शहरात इंधन दरवाढीविरोधातकेंद्र सरकारचा निषेध नोंदवत जोरदार आंदोलन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात व केंद्र सरकारच्या निषेधार्थ चिंचवड चौकात 'विश्वासघात' आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव अक्षय जैन, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार महागाई रोखण्यात सपशेल अपयशी ठरले तर आहेच पण नागरिकांवर मोठी संकटे निर्माण करणारे जनमारक सरकार ठरले आहे. या सरकारची नागरिकाप्रतीची विश्वासघातकी वृत्ती समोर आली आहे. केवळ काही उद्योजक हिताचे काम करत आहे.
देशातील नागरिकांपुढे आज जीवनावश्यक असलेल्या इंधन दरवाढीचे संकट येऊन ठेपले आहे. देशात प्रथमच पेट्रोल किमतीच्या इतिहासात पेट्रोल ची विक्रमीविक्री १०० रूपयां पर्यंत प्रतिलिटर झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका बॅरल कच्च्या तेलाची किंमत ६० डाॅलर च्या आसपास आहे, काही वर्षांपूर्वी काँग्रेस च्या मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात हा दर १०० डाॅलर असतानाही भारतात पेट्रोल व डिझेलने प्रति लिटर रू.७० किंवा रू.८० ची मर्यादा ओलांडली नव्हती.
.