नदीजोड प्रकल्पातील बंधाऱ्याचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:36 IST2018-11-13T00:36:30+5:302018-11-13T00:36:59+5:30
तांत्रिक कामे बाकी : पाणी अडविण्याची चाचणी नुकतीच यशस्वी

नदीजोड प्रकल्पातील बंधाऱ्याचे काम पूर्ण
सांगवी : कृष्णा-नीरा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत बंधारा पूर्ण झाला आहे. कांबळेश्वर (ता. बारामती) व सोमंथळी (ता. फलटण) येथील नीरा नदीवरील बंधाºयाचे काम पूर्ण झाले आहे. हा बंधारा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत कांबळेश्वर व सोमंथळी हद्दीतील नीरा नदीवर उच्च पातळी बंधारा बांधण्यात आला आहे. नीरा नदीवरील बंधाºयाचे काम तांत्रिकदृष्ट्या काही बाबी वगळता जवळपास पूर्णत्वास आला आहे. बंधाºयातील पाणी अडविण्याची चाचणी सध्या पूर्ण झाली आहे. काही अडचणीमुळे हे पाणी सोडून देण्यात आले आहे.
सरकारच्या पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाअंतर्गत कांबळेश्वर व सोमंथळी येथील बंधाºयातील पाणी मराठवाड्यासह स्थानिक शेतकºयांना फायद्याचे ठरणार आहे. बंधारा पूर्ण क्षमतेने अडविल्यास या परिसरातील दुष्काळ कायमस्वरूपी दूर होणार आहे. बंधाºयामध्ये पाणी अडविण्याची उंची आठ मीटर इतकी आहे. यापैकी साधारण चार मीटर उंचीपर्यंत पाणी अडविण्याची चाचणी नुकतीच घेण्यात आली आहे.
भविष्यात या बंधाºयाचा हजारो शेतकºयांना मोठा फायदा मिळणार आहे. परंतु या बंधारा पूर्ण क्षमतेने अडविल्यानंतर शेतीचे नुकसान होईल, याबाबत येथील शेतकºयांच्या मनात संभ्रम कायम आहे. हद्द निश्चिती व जमीन हस्तांतरणाची नुकसानभरपाई प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र या प्रकल्पाबाबत शेतकºयांना सविस्तर माहिती मिळावी यासाठी याची दक्षता घेऊन माहिती देण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.