शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

पिंपरीतील सेवा विकास बँकेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 15:49 IST

कर्जाच्या माध्यमातून पैशांचा गैर विनियोग व अपहार केला असून, बँकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अयोग्य नियंत्रण राखल्याची तक्रार आहे.

पिंपरी : खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून पिंपरीतील दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध कर्ज मंजूर करण्यात येत असल्याची तक्रार आहे. अशा कर्जाच्या माध्यमातून पैशांचा गैर विनियोग व अपहार केला असून, बँकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अयोग्य नियंत्रण राखल्याने २३८ कोटींचा बँक कर्जनिधी कर्जदारांकडे थकीत आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकारी व पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी धनराज नथुराम आसवानी (वय ५८, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. २०१० ते २०१९ पर्यंत हा प्रकार घडला. सेवा विकास बँकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी कर्जदारांकडून कर्ज परतफेडीसाठी प्रोमीसरी नोट, कर्ज करारनामा, कर्ज रोखा, जामीनरोखा, नजर गहाणखत करार इत्यादी करूनही नियमित कर्ज परतफेड झालेली नाही. योग्य कर्जदारांची निवड, सुयोग्य कर्ज मंजुरी, वितरण प्रक्रिया व मंजुरी पश्चात कर्ज निधीचा विनियोग इत्यादी बाबींवर रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकीय निदेर्शांचे उल्लंघन करून बँकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक अयोग्य नियंत्रण राखले. त्यामुळे २३८ कोटींचा कर्जनिधी थकीत होऊन संबंधित कर्जदाराकडे असुरक्षितरित्या नव्याजी अडकून पडलेला आहे. त्यामुळे बँकेतील ठेवीदारांचे व बँकेच्या आर्थिक हितास गंभीर बाधा पोहोचली आहे. परिणामी भागधारकांना तीन वर्षांपासून लाभांशाची रक्कम मिळालेली नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस