राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेत बिगाऱ्याची आत्महत्या; बोपखेलची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 20:19 IST2021-09-07T20:19:39+5:302021-09-07T20:19:55+5:30
आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेत बिगाऱ्याची आत्महत्या; बोपखेलची घटना
पिंपरी : बिगारी म्हणून काम करणाऱ्या एकाने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेतला. रामनगर, बोपखेल येथे मंगळवारी (दि. ७) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
विकास बापू शिंदे (वय ३०, रा. रामनगर, बोपखेल), असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास हा बिगारी म्हणून काम करीत होता. तो त्याच्या आई-वडिलांसह रामनगर येथे राहात होता. विकास हा मंगळवारी कामाला न जाता घरीच होता. त्याचे आईवडील बाहेर गेले असताना त्याने घरात गळफास घेतला. आई घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विकास याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर शवविच्छेदन झाले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.