शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त साहेब, मध्यरात्री शांतता भंग करणाऱ्यावर कारवाई कधी?

By विश्वास मोरे | Updated: January 22, 2025 16:32 IST

रस्त्यांवर रात्रीच्या पार्ट्यांमुळे ध्वनिप्रदूषण : नियमांची पायमल्ली

पिंपरी : वाढदिवसाच्या निमित्ताने रात्री १२ वाजेच्या सुमारास शहरातील चौकांमध्ये टोळक्याने जमा होऊन फटाके वाजवून शहराची शांतता भंग करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषणही होते. कसलीही भीती नसलेल्या टोळक्यांवर कारवाई होणार कधी? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबाजवणी व्हावी यासाठी पर्यावरणवादी ॲड. विकास शिंदे यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये रात्रीच्या १२ वाजता धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. चौकात २५-३० तरुण टोळक्याने जमतात. जमिनीवर आणि आकाशात आवाज करणारे फटाके अर्धा-एक तास वाजवले जातात. आवाजाने शहरातील शांतता भंग होऊन मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण तसेच वायू प्रदूषण होत आहे. लहान मुले, आजारी आणि वयस्करांसाठी हे सर्व घातक ठरत आहे.प्रदूषणात पडतेय भरसर्वोच्च व उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. रात्री १० नंतर ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बाबी (स्पीकर, फटाके) रोखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र, न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत आहे. रात्रीच्या वेळी फटाके वाजायला लागल्यानंतर अनेक नागरिक ११२ या पोलिस कंट्रोल रूमला कॉल करतात. तेव्हा पोलिस येऊन फक्त या मुलांना त्या ठिकाणावरून जाण्यास सांगतात.

रात्रीच्या १२ वाजता साजरे होणारे वाढदिवस, त्यामुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण, शहरातील भंग होणारी शांतता, झुंडीने गोळा झाल्यामुळे रात्रीची वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत. शहरांमध्ये रात्रीच्या १० नंतर फटाके वाजवून वाढदिवस साजरे करण्यास बंदीचे आदेश काढावेत. दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. - ॲड. विकास शिंदे (पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते)

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcivic issueनागरी समस्याPoliceपोलिसpollutionप्रदूषण