शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

महाविद्यालय ‘नॉटरिचेबल’, अकरावी प्रवेश प्रक्रिया : अनागोंदीमुळे विद्यार्थी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:58 AM

दहावीचा निकाल ८ जूनला जाहीर झाला. निकालापूर्वी पहिल्या टप्प्यात प्रवेश प्रक्रियेचा आॅनलाइन अर्ज विद्यार्थ्यांनी भरला आहे.

पिंपरी : दहावीचा निकाल ८ जूनला जाहीर झाला. निकालापूर्वी पहिल्या टप्प्यात प्रवेश प्रक्रियेचा आॅनलाइन अर्ज विद्यार्थ्यांनी भरला आहे. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, त्या महाविद्यालयांची नावे द्यायची आहेत. आॅनलाइन प्रवेशासाठी दीडशे रुपयांची पुस्तिका विद्यार्थ्यांनी खरेदी केली आहे. या पुस्तिकेच्या आधारे माहिती घेण्यासाठी संबंधितांना संपर्क साधला असता, योग्य प्रकारे प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे.विद्यार्थ्याने ज्या शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्या शाळेला संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाऐवजी दुसºया महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर पहिल्या शाळेतून त्यास योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्याच शाळेशी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थ्याला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दाखवली जाते. वेळोवेळी विद्यार्थ्याला मोबाइलवर मेसेज पाठविले जातात, अन्यथा विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्याबाबतही उदासीनता दाखवली जाते. पुस्तिकेत संपर्कासाठी शिक्षकांची नावे, मोबाइल क्रमांक दिले आहेत. त्यातील काही मोबाइलवर तर चक्क ‘नॉट रिचेबल’ असे उत्तर ऐकण्यास मिळते. त्यामुळे नेमका संपर्क तरी कोणाशी साधायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवेशप्रक्रियेबाबत आकुर्डीत नुकतेच एक मार्गदर्शन शिबिर झाले. परंतु शहरातील हजारो विद्यार्थ्यांना एकाच वेळी या शिबिराला उपस्थित राहणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेकांना प्रवेशप्रक्रियेची नेमकी माहिती मिळू शकली नाही.