लोणावळ्यात कडकडीत बंद; शांततेत भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 14:20 IST2018-01-03T13:28:24+5:302018-01-03T14:20:40+5:30

कोरेगाव भिमा या ठिकाणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ व सर्व लहान मोठे व्यावहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला.

closed circuit Lonavala; protest of Bhima Koregaon incident in peace | लोणावळ्यात कडकडीत बंद; शांततेत भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध

लोणावळ्यात कडकडीत बंद; शांततेत भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध

ठळक मुद्देरिपाइंच्या विविध संघटनांनी लोणावळ्यातील शिवाजी चौकात एकत्र येऊन घटनेचा नोंदवला निषेधअनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात

लोणावळा : कोरेगाव भिमा या ठिकाणी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजारपेठ व सर्व लहान मोठे व्यावहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळला.
लोणावळा बाजारपेठ, गवळीवाडा, नांगरगाव, खंडाळा, भांगरवाडी आदी सर्व भागांमध्ये बंद पाळण्यात आला. लोणावळा शहर व आजुबाजुच्या भागातील रिपाइंच्या विविध संघटनांनी लोणावळ्यातील शिवाजी चौकात एकत्र येऊन घटनेचा निषेध नोंदवत दुचाकी रॅली काढली. शहरात सर्वत्र शांततेत घटनेचा निषेध नोंदवत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: closed circuit Lonavala; protest of Bhima Koregaon incident in peace