शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

आयटीनगरीत असूनही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित; सत्तेतील कारभा-यांचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 5:22 AM

हिंजवडीमध्ये आयटी पार्क सुुरु झाल्यानंतर येथील विकासाला चालना मिळाली. मात्र, केवळ आयटी कंपन्यांच्या परिसराचा विकास झाला, तरी ग्रामस्थ अजूनही रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

वाकड : हिंजवडीमध्ये आयटी पार्क सुुरु झाल्यानंतर येथील विकासाला चालना मिळाली. मात्र, केवळ आयटी कंपन्यांच्या परिसराचा विकास झाला, तरी ग्रामस्थ अजूनही रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मात्र, महापालिकेची नियमावली, मिळकतकर आकारणी, वाढती पाणीपट्टी या विषयीची भीती ग्रामस्थांना असल्याने समावेशाविषयी त्यांची संभ्रमावस्था आहे.युती सरकारच्या काळात १९९५ ला हिंजवडी परिसरात आयटी पार्क वसविण्याची घोषणा झाली. मात्र या आयटी पार्कला १९९९-२००० मध्ये चालना मिळाली. ही जमेची बाजू आहे; मात्र गाव महापालिकेत समाविष्ट न झाल्यास विकासाला खो बसून बकालपणा अधिक वाढणार आहे. त्यामुळे हिंजवडीचा पालिका हद्दीत समावेश झाल्यास नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.हिंजवडी आणि परिसरात आयटी पार्कचा विस्तार झाल्यानंतर देशाच्या कानाकोपºयातून रोजगारासाठी लाखोंच्या संख्येने लोक येथे दाखल झाले आहेत. ८३३ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या हिंजवडी गावाची मागील जनगणनेनुसार ११,४५९ लोकसंख्या आहे; प्रत्यक्षात ५० हजारांहून अधिक येथील लोकसंख्या आहे. एका बाजूला भव्य-दिव्य, पंचतारांकित कंपन्यांचा झगमगाट असा आयटी पार्क आणि दुसºया बाजूलासर्वत्र अनधिकृत बांधकामांनी वेढल्याने गावाला आलेले बकालपण या दोन बाजू अशी सद्य:स्थिती हिंजवडीची आहे.गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यास सुविधा होतील, हे जरी खरे असले, तरी आमची ग्रामपंचायत देखील नागरी सुविधा पुरविण्यास सक्षम आहे. यापूर्वी समाविष्ट केलेल्या गावांचा महापालिकेने विकास साधला नाही. त्यामुळे नागरिकांत नकारात्मकता आहे. महापालिका हद्दीत समावेश करण्याऐवजी हिंजवडी-माण व अन्य गावे मिळून स्वतंत्र नगरपालिकेची स्थापना करावी.- रोहिणी साखरे, माजी सरपंच, हिंजवडीहिंजवडी गावाची लोकसंख्या वाढतच राहणार आहे. त्यामुळे गावाचा महापालिका हद्दीत समावेश होणार ही स्वागतार्ह बाब आहे. गाव समाविष्ट झाल्यास सर्व समस्या सुटून चांगल्या नागरी सुविधा पुरविल्या जातील. सेवा, सुविधाही मिळतील. विकास आराखड्यानुसार गावात सर्व सुखसुविधा मिळतील. त्यामुळे गावाचा महापालिका हद्दीत समावेश गरजेचा आहे.- राहुल जांभूळकर, माजी उपसरपंच, हिंजवडीवस्तुस्थिती नाकारता येत नाही. विकास होण्यासाठी महापालिकेची आवश्यकताच आहे. त्यामुळे महापालिकेने ही गावे समाविष्ट करावीत; मात्र गाव समाविष्ट करून विकास आराखड्याची त्वरित अंमलबजावणी करता येत नसेल, तर पाच गावे मिळून स्वतंत्र नगरपालिकेला मान्यता द्यावी. जेणेकरून स्वतंत्ररित्या राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने सर्वांगीण विकास साधता येईल. महापालिकेतील समावेशामुळे अनेक समस्या सुटतील आणि विकास होईल. - श्याम हुलावळे,माजी सरपंच, हिंजवडी

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड