पिंपरी महापालिकेत आयुक्तांना घेराव म्हणजे विरोधकांची स्टंटबाजी, सत्ताधाऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 05:22 PM2019-07-04T17:22:45+5:302019-07-04T17:23:12+5:30

घरोघरचा कचरा उचलण्याचे नवीन काम एक जुलैपासून सुरू झाले आहे..

circle to commissioner's means the opponents 'stunts' | पिंपरी महापालिकेत आयुक्तांना घेराव म्हणजे विरोधकांची स्टंटबाजी, सत्ताधाऱ्यांचा आरोप

पिंपरी महापालिकेत आयुक्तांना घेराव म्हणजे विरोधकांची स्टंटबाजी, सत्ताधाऱ्यांचा आरोप

Next

पिंपरी : कचरा संकलनाचे नवीन काम या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू झाले असून, कचराकोंडी झाल्याने विरोधकांनी आज आयुक्तांची भेट घेऊन घेराव घातल्याचा दावा केला असून, प्रत्यक्षात घेराव घातलाच नसल्याचे उघड झाले आहे.प्रसिद्धीसाठी ही विरोधकांची स्टंटबाजी आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. 
घरोघरचा कचरा उचलण्याचे नवीन काम एक जुलैपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी ठेकेदारांचा प्रयत्न फेल झाल्याचे लोकमतने उघडकीस आणले होते. त्यानंतर तीन दिवसांनीही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. याबाबत प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केबीनमध्ये कोंडण्याचा निश्चय विरोधीपक्षातील राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या पदाधिकाºयांनी केला. त्यानंतर सर्वजण सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावर पोहोचले. मनोज लोणकर यांच्याकडे आरोग्य विभाग आहे, म्हणून सर्व विरोधक प्रशासन अधिकाºयांच्या कार्यालयात गेले. मात्र, तिथे गेल्यावर आरोग्याचा कार्यभार डॉ. अनिल रॉय यांच्याकडे आहे, अशी माहिती मिळताच सर्वांनी आयुक्तांच्या कक्षाकडे मोर्चा वळविला. अधिकाºयांना कोंडणार? ही माध्यमांच्या प्रतिनिधींना कळल्यानंतर काहीजण आयुक्तांच्या केबीनमध्ये गेले. त्या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी उपस्थित होते. या आंदोलनात शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, राष्ट्रवादी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, श्याम लांडे, भाजपा नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष- युवराज दाखले, साहील शेख, सतीश भवाळ, मनोज लांडगे उपस्थित होते. आयुक्तांची चर्चा करीत विरोधकांनी फोटोसेशनही केले. त्यानंतर माध्यमांना आयुक्तांना घेराव अशा बातम्याही पाठविल्या. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचा घेराव आयुक्तांना घातला नाही. त्यामुळे अधिकाºयांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न फसला. 
ह्यह्यसंबधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस देऊन दोन दिवसांत शहरातील कचरा समस्या व्यवस्थित संकलन करणार आहे, असे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्याचे विविध पक्षीय गटनेत्यांनी माध्यमांना सांगितले. विरोधकांच्या स्टंटबाजीवर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. प्रसिद्धीसाठी ही विरोधकांची स्टंटबाजी आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

Web Title: circle to commissioner's means the opponents 'stunts'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.