रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्यावर चॉपरने वार, खिशातील पैसेही जबरदस्तीने काढून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 19:29 IST2021-07-03T19:28:14+5:302021-07-03T19:29:06+5:30
फिर्यादी हे संतोषी माता चौक, नेहरूनगर येथे मासे विक्री करतात.

रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्यावर चॉपरने वार, खिशातील पैसेही जबरदस्तीने काढून घेतले
पिंपरी : रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर चॉपरने वार केले. तसेच त्याच्या खिशातील पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. एच. ए. मैदान नेहरूनगर, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. २) ही घटना घडली.
रोहित प्रवीण धनवे (वय १८, रा. नेहरूनगर, पिंपरी), कैलास पाटोळे (वय १८, रा. फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी), ऋतिक सोरटे (वय २०, रा. राजीव गांधी वसाहत, पिंपरी), अशी आरोपींची नावे आहेत. रामअजोरे बनवारी परदेशी (वय ४५ रा. घरकुल, स्पाईन रोड, चिखली) यांनी शुक्रवारी (दि. २) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी हे संतोषी माता चौक, नेहरूनगर येथे मासे विक्री करतात. आरोपी हे फिर्यादीच्या दुकानावर आले. फिर्यादीला मारहाण करून त्यांच्या खिशातील ५०० रुपये काढून घेतले. त्यावेळी फिर्यादीने प्रतिकार केला असता आरोपींनी त्यांच्यावर चॉपरने वार केला. यात फिर्यादी जखमी झाले.