शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

वडगाव मावळ येथील अवजड दगड गोटे उचलण्याच्या स्पर्धेत चिराग वाघवले विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 4:43 PM

वडगाव येथील ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिराच्या पटांगणात ८५ किलो वजनाची गोटी मानेवर ठेवून १३२ बैठका मारून प्रथम क्रमांक पटकाविला. 

ठळक मुद्दे८५, ९५ व ११५ किलो वजनाच्या गोल दगडांचे गोटे उचलण्याचा प्रयत्न

वडगाव मावळ : पारंपरिक पद्धतीने धूलवडीचा सण साजरा करण्यासाठी वडगाव येथील ग्रामदैवत पोटोबामहाराज मंदिराच्या पटांगणात गोल आकाराचे दगडांचे मोठे गोटे उचलून बैठका मारण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. स्पर्धेत सह्याद्री जिमखान्याचा चिराग संतोष वाघवले याने ८५ किलो वजनाची गोटी मानेवर ठेवून १३२ बैठका मारून प्रथम क्रमांक पटकाविला. तहसीलदार रणजीत देसाई व पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नगराध्यक्ष मयूर ढोरे, गणेश ढोरे, बाळासाहेब नेवाळे, भास्करराव म्हाळसकर, तुकाराम ढोरे, पंढरीनाथ ढोरे, बिहारीलाल दुबे, विठ्ठल भोसले, सुनील चव्हाण, रवींद्र यादव, दत्तात्रय कुडे, अनंता कुडे, किरण भिलारे, सुधारक ढोरे आदी या वेळी उपस्थित होते. जय बजरंग तालीम मंडळाच्या वतीने शुभम तोडकर, रुचिका ढोरे व किरण चिमटे, किशोर ढोरे यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.८५, ९५ व ११५ किलो वजनाच्या गोल दगडांचे गोटे उचलण्याचा प्रयत्न फ्रेण्ड्स जिमखाना, सह्याद्री, जय बजरंग तालीम मंडळ, दुबे गुरुकुलच्या खेळाडूंनी केला. प्रथम क्रमांक पटकाविलेल्या वाघवले यांचा ग्रामस्थांतर्फे १५ हजार रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला. गणेश विनोदे, सुनील चव्हाण, विकी म्हाळसकर यांनी सूत्रसंचालन केले.

८० किलो वजनाची गोटी खांद्यावर घेऊन बैठका मारणारे खेळाडू प्रथम - चिराग वाघवले (१३१ बैठका), द्वितीय - किशोर धोत्रे (५६), तृतीय - सौरभ ढोरे (५५). हृषीकेश चव्हाण (५४), महेंद्र सुर्वे (४०), गोकुळ काकडे (४३), मच्छिंद्र कराळे (२५), अमृता जाधव (३२), मयूर चव्हाण (२१), गजकुमार भिलारे (२०), अजिंक्य कुडे (८) आदींनी यशस्वी प्रयत्न केले. 

बैठका : वडगाव मावळ येथे ८५ किलो वजनाची दगडाची गोटी मानेवर ठेवून १३१ बैठका मारणारा चिराग वाघवले.

 

टॅग्स :mavalमावळ