चिंचवड ते कन्याकुमारी सात दिवसांत; पर्यावरण, शिक्षण, आरोग्य विषयक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 04:40 AM2017-12-20T04:40:47+5:302017-12-20T04:41:52+5:30

साडे सात दिवसांत चिंचवड ते कन्याकुमारी (तामिळनाडू) सायकल प्रवास जलदगतीने पूर्ण करण्याचा पराक्रम इंडो सायकलिस्ट क्लबच्या तीन तरुणांनी केला. चार राज्य, २२ जिल्हे, ११ मोठे घाट तसेच महामार्ग, डोंगर रांगा, किनारपट्टीचा प्रदेश व दोन घनदाट जंगले पार करून

 Chinchwad to Kanyakumari in seven days; Environment, education, health related messages | चिंचवड ते कन्याकुमारी सात दिवसांत; पर्यावरण, शिक्षण, आरोग्य विषयक संदेश

चिंचवड ते कन्याकुमारी सात दिवसांत; पर्यावरण, शिक्षण, आरोग्य विषयक संदेश

Next

पिंपरी : साडे सात दिवसांत चिंचवड ते कन्याकुमारी (तामिळनाडू) सायकल प्रवास जलदगतीने पूर्ण करण्याचा पराक्रम इंडो सायकलिस्ट क्लबच्या तीन तरुणांनी केला. चार राज्य, २२ जिल्हे, ११ मोठे घाट तसेच महामार्ग, डोंगर रांगा, किनारपट्टीचा प्रदेश व दोन घनदाट जंगले पार करून क्लबचे संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे, सदस्य शंकर गाढवे व उद्योजक हाज्जी देवनीकर यांनी ही मोहीम पूर्ण केली. त्यांच्याकडून १६३८ किलोमीटरचा प्रवास व १२,२३६ मीटरचे एलेवेशन कव्हर झाले.
८ डिसेंबर रोजी सकाळी चार वाजता मोरया गोसावी गणपती मंदिर चिंचवड या ठिकाणाहून प्रवास सुरू केला. क्लब कोअर कमिटीचे अजित पाटील, विश्वकांत उपाध्याय, गणेश भुजबळ, अमित खरोटे तसेच ज्ञानप्रबोधिनीचे २० ते २५ विद्यार्थी, पालक व शिक्षक, अवधूत गुरव, अनुराग हिंगे आदी उपस्थित होते. गणपती बाप्पाला नारळ चढवून सातारा-कोल्हापूरच्या दिशेने सुरू झाला. ५ ते ७ किलो वजन सोबत घेऊन पूर्ण प्रकारे सेल्फ सर्पोटेड प्रकारातील ही मोहीम होती.
पहिल्या दिवशी चिंचवड ते नेर्ले (कोल्हापूर) असा २०६ किमीचा तर दुसºया दिवशी नेर्ले (कोल्हापूर) ते धारवाड हा २२९ किमीचा टप्पा पार केला. नंतर धारवाड ते चित्रदुर्ग (२३३ किमी), चित्रदुर्ग ते म्हैसूर (२१८ किमी), म्हैसूर ते कालिकत (२३६ किमी), कालिकत ते कोची (२०० किमी) कोची ते तिरुअनंतपुरम (२१४ किमी), तिरुअनंतपुरम ते कन्याकुमारी (१०० किमी) हे टप्पे पार केले.
चिंचवड ते नेर्ले (कोल्हापूर) दरम्यान कात्रज व खंबाटकी हे तर नेर्ले ते धारवाडदरम्यान तवांडी व बेळगावच्या आधी वंतामुरे घाट होते. तेथे उलट दिशेने येणाºया वाहनांचा त्रास झाला. धारवाड ते चित्रदुर्गदरम्यान बागेवाडी घाट लागला तर विरुद्ध दिशेने येणाºया वाºयामुळे अंतर कापणे सोपे गेले नाही. चित्रदुर्ग ते म्हैसूर हा मार्ग मुद्दाम निवडला होता. आम्ही सरळ बंगळुरू व मदुराईमार्गे ६ दिवसांत कन्याकुमारीला पोहोचलो असतो. पण तीन राज्यांत पसरलेले बंडीपूर व वायनाडचे घनदाट जंगल खुणावत होते. किनारपट्टीचा प्रदेशही आकर्षित करत होता. ओखी वादळ पण दूर गेल्याने किनारपट्टी भागातून सायकल चालवण्याचा आनंद घेता आला. बंडीपूरचे जंगल चंदन व हस्तिदंत तस्करीसाठी प्रसिद्ध आहे. वायनाडचे जंगल हत्ती व इतर हिंस्र पशूंसाठी प्रसिद्ध आहे. या दोन जंगलांमधील ८० किमीचा प्रवास अतिशय रोमांचकारी होता. वाटेत हरीण, हत्ती, माकड तसेच इतर प्राणी दिसले. या दोन जंगलांमध्ये पूर्वी म्हैसूरचा राजा शिकार करत असे. चंदनतस्कर वीरप्पनची याच परिसरात दहशत होती, असे कर्नाटक वन विभागाच्या अधिकाºयाने सांगितले. त्यांनी एक कर्मचारी वाहनही मदतीसाठी आमच्या मागे दिले. दख्खनच्या पठारावरून आम्ही पाचव्या दिवशी किनारपट्टी भागात म्हणजेच कालिकतमध्ये प्रवेश केला.
कालिकत येथील क्लबच्या सदस्यांनी स्वागत करून पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. कालिकत पेडलर्सचे सदस्य आमच्या सोबत २० किमीपर्यंत आले. कालिकत ते कोचीदरम्यानचा मार्ग सरळ होता. पण हवामानातील आद्रता जाणवत होती. कोची ते तिरुअनंतपुरम हा प्रदेश निसर्गाने मुक्त उधळण केल्याप्रमाणे सुंदर आहे. तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभ स्वामी मंदिरात दर्शन घेऊन तामिळनाडूमध्ये प्रवेश केला. दरम्यान मुरुगन उत्सव चालू असल्याने भाविकांची मिरवणूक चालू होती.
पुढे पाऊस सुरू झाला आणि
आम्ही नागरकॉईल मार्गे दुपारी
१२ वाजता कन्याकुमारीमध्ये
प्रवेश केला.
रोज २२० किलोमीटरचा पल्ला
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या चार राज्यांमधून सायकल प्रवास केला. पर्यावरण, सायकल वापर व आरोग्य, बदलती शिक्षण पद्धती किंवा शिक्षणाचे झालेले बाजारीकरण थांबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळीच दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई व्हावी. शिक्षण हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. दररोज ८० ते १०० किलोमीटर सायकलिंगच्या सवयीमुळे प्रवास अवघड गेला नाही. रोज साधारण २२० किलोमीटर सायकल प्रवास केला गेला. साधारणत: पहाटे ५ ते दुपारी १२ पर्यंत सायकलिंग १२ ते ४ पर्यंत विश्रांती आणि ४ ते ८ पर्यंत सायकलिंग व पुन्हा ८ ते पहाटे ४ पर्यंत झोप अशा पद्धतीचा दिनक्रम होता.
महाराष्ट्र, कर्नाटक , केरळ व तामिळनाडू या सर्व राज्यांतील लोकांचे प्रेम मिळाले. आपुलकीने सर्व चौकशी करत होते. त्यांना आमच्या मोहिमेबद्दल खूप उत्सुकता वाटत होती. अनेकदा लोकांनी घरी येण्याचा आग्रह केला. पण, प्रवासाच्या नियोजनामुळे जाता आले नाही.

Web Title:  Chinchwad to Kanyakumari in seven days; Environment, education, health related messages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.