शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

पिंपरी शहराच्या महापौर पदावर चिंचवड मतदारसंघाचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 1:39 PM

चिंचवडमधील कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

ठळक मुद्देपदांची खांदेपालट : स्थायी समिती सभापतीपद भोसरीला महापौरपदासाठी दावेदार महिला; सोमवारी अर्ज दाखल होणार?

पिंपरी : स्थायी समिती सभापती आणि महापौर ही दोन पदे भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये दिली आहेत. पुढील वर्षी पदांमध्ये खांदेपालट होऊन स्थायी समिती अध्यक्षपद भोसरीकडे आणि महापौरपद चिंचवडला जाणार आहे. त्यामुळे चिंचवडमधील कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. शहराचे महापौरपद आगामी अडीच वर्षाकरिता महिलेसाठी राखीव झाले आहे. सत्ताधारी भाजपाकडून खुला प्रवर्गातून २१ महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे तिन्ही मतदारसंघातील इच्छुकांनी आपल्या नावाची वर्णी लागण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरामध्ये भाजपामध्ये शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांचे दोन गट आहेत. तर, खासदार अमर साबळे यांच्यासह निष्ठावंतांचा तिसरा गट आहे. अडीच वर्षात महापालिकेतील पदे आमदारांच्या शिफारशीनुसारच दिली आहेत. त्यामुळे आमदारांचा गट महापालिकेच्या राजकारणात वरचढ ठरला आहे.चिंचवडलाच मिळणार संधी पहिले अडीच वर्ष भोसरीकडे महापौरपद राहिले तर स्थायी समिती सभापती पद चिंचवडकडे राहिले. त्यामुळे दुसरे अडीच वर्ष चिंचवडकडे महापौरपद आणि भोसरीकडे स्थायी समिती अध्यक्षपद राहणार असल्याची  चर्चा आहे. महापौर पद देताना विधानसभा निवडणुकीतील प्रभागातील मताधिक्य, प्रभागात पक्षाची बांधणीचा निकष ग्राह्य धरला जाण्याची शक्यता आहे.....असा होऊ शकतो विचार४चिंचवडकरांकडे महापौरपद आल्यास ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, आरती चौंधे, झामाबाई बारणे, माया बारणे, माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे  यांचे नाव पुढे येऊ शकते. भोसरीकरांकडे महापौरपद घ्यायचे ठरल्यास निर्मला गायकवाड, प्रा. सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पिंपरीतील अनुराधा गोरखे यांच्या समर्थकांनीही महापौरपदाची मागणी केली आहे. तसेच पिंपरीतून शर्मिला बाबर, सुजाता पालांडे, कोमल मेवाणी यांचाही नावे इच्छुकांमध्ये आहेत. 

.............

महापौरपदासाठी दावेदार महिलाशैलजा मोरे, माई ढोरे, नीता पाडाळे, शर्मिला बाबर, संगीता भोंडवे, आरती चौंधे, सुजाता पालांडे, माया बारणे, प्रियंका बारसे, सोनाली गव्हाणे, सारिका सस्ते, निर्मला गायकवाड, भीमाबाई फुगे, माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे, कोमल मेवाणी,  सुनीता तापकीर, निर्मला कुटे, चंदा लोखंडे, सीमा चौगुले, साधना मळेकर यांचा समावेश आहे. 

सोमवारी अर्ज दाखल होणार?महापौरपदासाठी सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरला सकाळी अकराला निवडणूक होणार आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMayorमहापौरBJPभाजपाElectionनिवडणूक