शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Chinchwad By-Election | चिंचवडची लढत होणार तिरंगी; राहूल कलाटे लढण्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 15:31 IST

हुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे...

पिंपरी : शिवसेना बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते वाकडमध्ये दाखल झाले होते. बंद दाराआड चर्चाही झाली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. राहूल कलाटे चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहेत. आज सकाळपासून बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते.

चिंचवडमधील बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला यश आलेले नाही. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घेतलेली नाही. त्यांच्या कचेरीतून ते गायब झालेले आहेत. ते नक्की कुठे गेले आहेत. माघारी घेण्याविषयी भूमिका काय आहे. याबाबत कोणतीही माहिती मिळू शकत नाही. त्यांची समजूत काढण्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष माजी महापौर संजोग पाटील दाखल झालेले होते.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत-

चिंचवड विधानसभा निवडणूक राहुल कलाटे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक तिरंगी होणार आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज माघारीची वेळ दुपारी तीन पर्यंत होती. मात्र, शिवसेना बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे चिंचवडची लढत तिरंगी होणार आहे. त्यामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीच्या वतीने नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी लढत होणार आहे.

दुपारी एक वाजता मावळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर भेगडे, माजी महापौर योगेश बहल, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे हे कलाटे यांची मनधरणी करत आहेत. योगेश बहल म्हणाले, '' कलाटे यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे, त्यांनी माघार घ्यावी. यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने प्रयत्न केले जात आहे.  मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे.''

टॅग्स :pimpri-acपिंपरीPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा