शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चार - दोन कार्ट्यांना गोळ्या घाला पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 21:02 IST

ऐतिहासिक गड, किल्ले हॉटेल व्यवसाय करण्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची चर्चा आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यभर सरकारविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत.

पिंपरी : ऐतिहासिक गड, किल्ले हॉटेल व्यवसाय करण्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची चर्चा आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यभर सरकारविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. असे असताना सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंटवरून यासंबंधित आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने एकावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

‘गड किल्ल्यांना विरोध करणाऱ्या चार दोन कार्ट्यांना गोळ्या झाडा, एकही कार्ट गडाजवळ थांबणार नाही, मुख्यमंत्री साहेब तुम्ही निर्णय मागे घेऊ नका’, अशा आशयाची पोस्ट ‘एक करोड मराठ्यांचा फेसबुक ग्रुप जो एक मराठा अ‍ॅड होईल त्याने १०० अ‍ॅड करावे’ या ग्रुपवर व्हायरल झाली आहे.   यासंबंधी पराग पुरुषोत्तम जोशी (वय ४०, रा. भालके टॉवर, निंबाळकर प्लाझाजवळ, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी एकावर भा. दं. वि. कलम १५३ (अ), सह आयटी अ‍ॅक्ट कलम ६६ (सी) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ९) रात्री साडेनऊच्या सुमारास निदर्शनास आला आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग पुरुषोत्तम जोशी यांच्या फेसबुक अकाउंटवरील फोटोचा व नावाचा वापर करून दिनेश आर. सूर्यवंशी यांच्या फेसबूक अकाउंटवरून ‘एक करोड मराठ्यांचा फेसबुक ग्रुप जो एक मराठा अ‍ॅड होईल त्याने १०० अ‍ॅड करावे’ या ग्रुपवर अशी आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केली होती. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमFacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस