शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

सण ना सुद तरी फटाक्यांचा धूर, दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल, नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:33 AM

शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर मोठ मोठे फटाके वाजत असून, हे फटाके म्हणजे दुचाकी वाहनाच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट फेरबदल करून फटाक्याच्या स्फोट सारखा आवाज काढला जातो आहे.

कामशेत - शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर मोठ मोठे फटाके वाजत असून, हे फटाके म्हणजे दुचाकी वाहनाच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट फेरबदल करून फटाक्याच्या स्फोट सारखा आवाज काढला जातो आहे. काही खोडसाळ व टवाळखोर तरुण हे प्रकार करत असून, त्याचा रस्त्याने जाणारे इतर वाहनचालक, पादचारी, रुग्ण व नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या शिवाय शहरातील मुख्य रस्त्यावर शालेय विद्यार्थिनी व महिला यांच्या शेजारी दुचाकीवर विविध प्रकारचे स्टन्ट करणारे त्यांच्यामुळे वाहतुकीस अडचण होत आहे.शहरात सध्या बुलेट व इतर स्पोर्ट्बाईकची क्रेज वाढली असून, सुसाट निघालेल्या तरुण पिढीतील काही उनाड व टवाळखोर मुलांकडून या वाहनांचा वेगळ्या कारणासाठी उपयोग होत आहे. शहरात काही महिन्यांपासून बुलेट व इतर मॉडिफाइड स्पोर्ट्बाईकच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट फेरबदल करून मिसफायरिंगच्या नावाखाली मोठ्या फटाक्यांच्या स्फोटाचे आवाज काढले जात आहेत.वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. तसेच पवनानगर व लोणावळा भागात वर्षाविहारासाठी पर्यटकांकडून चिरीमिरी गोळा करण्यात वाहतूक विभाग मश्गुल आहे. शहरात ठरावीक ठिकाणी या दुचाकींवर वेगवेगळे स्टन्ट करणे, या दुचाकी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून भरधाव चालवणे, पादचाऱ्यांना कट मारणे या सारख्या प्रकारांमुळे नागरिक हैराण झाले असून, रस्त्यावरून जाणाºया इतर वाहनचालक दचकून बाजूला होत आहेत. तर पादचाºयांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. शहरातील विद्यालय, शाळा, खासगी शिकवण्या भरणे व सुटण्याच्या वेळेत या टवाळखोर मुलांना जास्तच चेव चढत असल्याचे बोलले जात आहे. स्टंटबाजी करणारे युवक वाहनचालकांना दमदाटी करतात. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हुल्लडबाज तरुणांवर प्रशासनाने कारवाई करावी तसेच अल्पवयीन चालकांची मोठ्याप्रमाणात संख्या वाढत असून, त्यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे.पोलीस महानिरीक्षकाचे आदेश वा-यावरसध्या मावळात स्पोर्ट व मोडिफाय दुचाकी वाहनांची मोठी के्रझ वाढली असून, एकेकाळी एखाद दुसरी दिसणारी बुलट अथवा स्पोर्टबाईक गाडी आत्ता दर पाच मिनिटांनी रस्त्यावरून जाताना दिसते. याचबरोबर इतर मोडिफाय गाड्याही दिसू लागल्या आहेत. काही खोडसाळ तरुण या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये ठरावीक बदल करून मिस फायरिंगच्या नावाखाली मोठे फटाक्यासारखे आवाज काढत असून, आजूबाजूला जाणाºया इतर वाहनांवरील चालक दचकून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मावळासह कामशेत शहरात त्यामुळे दिवसभर फटाक्यांचे भयंकर आवाज होत असतात. मागील वर्षी कामशेत येथे नागरिकांबरोबर झालेल्या चर्चा सत्रात कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनीही मान्य केले की, मावळात बुलेट गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच स्थानिक पोलीस अधिकाºयांना मोडिफाय वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र वाहतूक पोलिसांची एक वर्षांपासूनची उदासीनता कायम आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या