शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील पन्नास टक्के विद्यार्थ्यांना तीन महिन्यांत आधार कार्ड देण्याचे शिक्षण विभागासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 10:57 IST

३१ मार्चपर्यंत नोंदणी अद्यावतीकरण पूर्ण करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सूचना

ठळक मुद्देकोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शहरातील बहुतांश आधार कार्ड केंद्र होते बंद शिक्षण विभागाने आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण केले बंधनकारक

पिंपरी : शहरातील ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे अद्यापही बाकी आहे. राज्यातील १ ली ते १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरण ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करा, अशा सूचना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे तीन महिन्यांत शिल्लक असलेल्या ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि अद्यावतीकरण करण्याचे आव्हान शिक्षण विभागावर आहे.

शहरातील ३ लाख १९ हजार ६२४ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५६ हजार ६६ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही काढलेले नाही. पिंपरी विभागातील ४८.३० टक्के, तर आकुर्डी विभागातील ५२.३७ टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि अद्यावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात शहरातील बहुतांश आधार कार्ड केंद्र बंद होते. लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे ही आधार नोंदणी राहिलेली आहे. मार्चपासून शाळा बंद आहेत. आधार कार्ड काढण्याच्या मशीन उपलब्ध नाहीत. आदी कारणांमुळे आधार नोंदणी आणि अद्यावतीकरणाचे काम रखडले आहे.

शालेय पोषण आहार योजना, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक योजना या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो. या योजनांचा लाभ घेण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सरल संकेतस्थळावर उपलब्ध असावी. संबंधितांना लाभाचे दुबार प्रदान रोखण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीमध्ये नोंद होणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी म्हणजेच एकच आधार; पण २ नावांचे वेगळे विद्यार्थी दाखविल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर काही अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचे प्रकार समोर आले होते. या सर्व बाबींवर आळा घालण्यासाठी सर्व विद्यार्थी आधार क्रमांक नोंदवून त्याची खात्री होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण बंधनकारक केले आहे.---

कोरोनामुळे आधार कार्ड काढण्याचे आणि अद्यावतीकरण करण्याचे काम राहिलेले आहे. मार्चपासून शाळाही बंद आहेत. शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि अद्यावतीकरणाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.पराग मुंढे, सहायक प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणAdhar Cardआधार कार्ड