मुलीला क्लासला सोडून परत येणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 20:12 IST2019-11-08T20:07:45+5:302019-11-08T20:12:28+5:30
मुलीला क्लासला सोडून घरी जात असलेल्या महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावले...

मुलीला क्लासला सोडून परत येणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
पिंपरी : मुलीला क्लासला सोडून घरी जात असलेल्या महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावले. ही घटना बुधवारी (दि. ६) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास श्रीधरनगरच्या समोर लिंक रोडवर चिंचवड येथे घडली.
याप्रकरणी जी. नित्या लक्ष्मी (वय ३७, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या त्यांच्या मुलीला क्लासला सोडून घरी येत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांने त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.