आकुर्डीत चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मोटार पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 14:08 IST2018-07-07T14:03:18+5:302018-07-07T14:08:00+5:30
मोटारीच्या अपघातामुळे ग्रेडसेप्रेटरमधील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

आकुर्डीत चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मोटार पलटी
पिंपरी : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगातील मोटार चिंचवड येथील ग्रेड सेप्रेटरमध्ये पलटी झाली. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास झालेल्या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मोटारीतले चारही जण बचावले.
आकुर्डीतील मुक्कामानंतर पंढरपुरच्या दिशेने सकाळी सहा वाजताच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गस्थ झाला. आकुर्डी ते चिंचवड,पिंपरी, दापोडी मार्गावर वारकऱ्यांच्या रांगा होत्या. त्याचबरोबर दर्शनासाठी नागरिकांचीही गर्दी झाली होती. अशा परिस्थितीत (एमएच. १४ बी सी ८७८५ ) या क्रमाकांची मोटार भरधाव वेगाने चिंचवडच्या ग्रेड सेप्रेटरमधुन जात होती. हा अपघात झाला त्याचवेळी सर्व्हीस रस्त्यावरून तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने जात होता. मोटारीच्या अपघातामुळे ग्रेडसेप्रेटरमधील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
.......................