शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

किशोर आवारे यांची निर्घृण हत्या; भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे तळेगाव हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 15:54 IST

किशोर आवरे यांच्या मृत्यूची वार्ता समजताच उपस्थितांनी मोठा आक्रोश केला

तळेगाव दाभाडे: जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर गंगाराम आवारे (वय ५०) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. या प्राणघातक हल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे तळेगाव शहर हादरून गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे शुक्रवारी (दि.१२) दुपारी दीडच्या सुमारास तळेगाव नगरपालिकेतून बाहेर पडले. मात्र मुख्य प्रवेशद्वाराच्या आवारात त्यांच्यावर तीन ते चार जणांच्या टोळक्याने  गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला. या प्राणघातक हल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना सोमाटणे फाटा येथील पवना रूग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालय बाहेर मोठ्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग एकवटला होता. किशोर आवरे यांच्या मृत्यूची वार्ता समजताच उपस्थितांनी मोठा आक्रोश केला. शिवविच्छेदनासाठी किशोर आवरे यांचा मृतदेह पिंपरी चिंचवड येथील शासकीय वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

मागील काही काळा पासून सोमाटणे येथील अनधिकृत टोल नाक्याप्रश्नी आवारे यांनी मोठे जनआंदोलन छेडले होते. टोलनाका कायमचा बंद करण्यासाठी त्यांनी बेमदत उपोषणही केले होते. याची दखल राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली. यावेळी आंदोलनकर्त्यांना टोलचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. किशोर आवारे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा तळेगाव शहरात निषेध केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliticsराजकारणbusinessव्यवसाय