शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आईला शिवीगाळ का करतोस विचारणाऱ्या बहिणीवर भावाचे कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 19:27 IST

आईला शिवीगाळ का करतोस असा जाब विचारणाऱ्या बहिणीवर भावानेच कोयत्याने वार केला. तर दुसऱ्या  बहिणीला शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी निगडी ओटास्किम येथे घडली.

पिंपरी : आईला शिवीगाळ का करतोस असा जाब विचारणाऱ्या बहिणीवर भावानेच कोयत्याने वार केला. तर दुसऱ्या  बहिणीला शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी निगडी ओटास्किम येथे घडली.

दिलदार उर्फ नसरुद्दीन शबू खान (वय २६, रा. दळवीनगर, इमारत क्रमांक ई-१, ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी करिष्मा शब्बु खान (वय २१) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी दुपारी चारच्या सुमारास करिष्मा खान तसेच त्यांची आई शमा, बहिण निशा आणि भाऊ नसरुद्दीन शबू खान हे घरामध्ये बसले होते.

 त्यावेळी आरोपी नसरुद्दीन खान आईला शिवीगाळ करीत होता. दरम्यान, करिष्मा खान या त्यांचा भाऊ नसरुद्दीन याला म्हणाल्या, आईला कशाला शिवीगाळ का करतोस. असे म्हणताच आरोपीने करिष्मा खान यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच लोखंडी कोयता करिष्मा यांच्या पायावर मारल्याने त्या जखमी झाल्या. यासह त्यांची बहिण निशा यांनाही शिवीगाळ केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसrelationshipरिलेशनशिप