पत्नीला ब्लॅकमेल करून मागितली मोटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 02:50 IST2018-09-17T02:50:11+5:302018-09-17T02:50:32+5:30

गोवा येथील हॉटेलात अनैसर्गिक कृत्य करीत, जबरदस्तीने मोबाइलवर काढलेली छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार ब्लॅकमेल केले.

Blackmailed by the blackmailer | पत्नीला ब्लॅकमेल करून मागितली मोटार

पत्नीला ब्लॅकमेल करून मागितली मोटार

पिंपरी : गोवा येथील हॉटेलात अनैसर्गिक कृत्य करीत, जबरदस्तीने मोबाइलवर काढलेली छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार ब्लॅकमेल केले. चारित्र्यावर संशय घेत शारिरीक, मानसिक छळ केल्याप्रकरणी विवाहितेने पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पती आणि अन्य दोघांच्या विरोधात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सासऱ्यांनी माहेरहून मोटार खरेदीसाठी पैसे आणावेत, असा तगादा लावला. नणंदने हाताने मारहाण करीत शिवीगाळ केली. तिघांविरोधात विवाहितेने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पतीने गोव्यात नेऊन अत्यंत वाईट कृत्य केले. तसेच मित्राबरोबर संबंध आहेत, असे म्हणत चारित्र्यावर संशय घेतला. पती, नणंद आणि सासरे यांच्याकडून त्रास होत आहे. पतीने मोबाइल घेऊन मित्राच्या मदतीने त्या मोबाइलमध्ये छायाचित्रे अपलोड केली.

Web Title: Blackmailed by the blackmailer