शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाही राफेलचे उत्तर जनतेसमोर जाऊनच देणार: विश्वास पाठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 13:09 IST

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी प्रकरणात भाजपाला क्लीनचिट दिली असली तरी काँग्रेस पक्षाचे आरोप कायम आहेत. काँग्रेसने चौकीदार ...

ठळक मुद्देराफेलविषयी सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत आरोप प्रत्यारोप सुरू

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी प्रकरणात भाजपाला क्लीनचिट दिली असली तरी काँग्रेस पक्षाचे आरोप कायम आहेत. काँग्रेसने चौकीदार चोर है असे आंदोलन सुरू केले आहे. हे चुकीचे आहे,  विरोधकांनी जनतेसमोर पंतप्रधानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असेल, राजकीय लाभासाठी ही टीका आहे. तर भाजपाही त्याचे उत्तर जनतेसमोर जाऊनच देणार आहे, असे भाजपाचे पक्ष प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रकार सांगितले. राफेलविषयी सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यूपीए सरकारच्या काळात या व्यवहाराबाबत कशी दिरंगाई झाली, या व्यवहारात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा सहभाग का नाही, रिलायन्स कंपनी या व्यवहारात काय भूमिका पार पाडणार यासंदर्भात पाठक यांनी माहिती दिली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, प्रमोद निसळ, अमोल थोरात, संजीवनी पांडये, आर. एस. कुमार आदी उपस्थित होते.पाठक म्हणाले, राफेल विमानाची निवड काँग्रेसच्या शासनानेच केली. पण कराराबाबत दोन्ही देशात एकमत होत नव्हते. कारण तेथे दलालीचा विषय निकाली निघत नव्हता.  त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सुत्रे स्वीकारली. तोपर्यंत विमान खरेदी प्रकरण काँग्रेसने बासनात गुंडाळून ठेवले होते. काँग्रेसने केलेला करार फ्रान्सच्या द-सॉल्ट एव्हिएशन कंपनीला मान्य नव्हता. त्यामुळे वादग्रस्त करार तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी रद्द केला. पुढे विमान खरेदीचा सामंजस्य करार झाला. हा करार संपुर्ण देशासमोर आहे.  संपूर्ण व्यवहार पारदर्शक आहे. भारतातील हवाई दलातील लढाऊ विमानांची संख्या झपाटयाने कमी होत असताना उच्च तंत्रज्ञानावर आधारित लढाऊ विमानांची देशाला गरज आहे. देशाला १५० विमानांची आवश्यकता आहे. सरकारने केलेल्या या करारात खूप मोठा फरक आहे. कुठलाही फरक लक्षात न घेता काँग्रेसवाले आणि त्यांचे गल्लीतले नेते केवळ किमतींच्या अनुषंगाने मोदींवर टीका करीत आहे. ही टीका म्हणजे बौध्दिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. विमान खरेदीच्या कराराची ही वस्तुस्थिती पाहता काँग्रेसने केलेले आरोप आणि टीका ही केवळ राजकीय लाभापोटी आणि राजकीय वातावरण गढूळ करण्याच्या उद्देशाने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेRafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी