शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

पार्थ पवारांसोबत झळकले भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि राजकीय चर्चांना आले उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 13:41 IST

युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व आहे.

ठळक मुद्देमावळची उमेदवारी शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना गेल्याने लक्ष्मण जगताप आहेत नाराज

पिंपरी-चिंचवड : मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार  पार्थ अजित पवार व भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची शिवजयंती निमित्त पिंपळे गुरवमध्ये हे दोन्ही नेते एकत्र आले. त्यामुळे जगताप यांचा पार्थला पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व आहे.

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज प्रचारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आहेत. त्यात आज शिवजयंती असल्यामुळे त्यांनी शहरातील मंडळांच्या भेटी घेतल्या. पिंपळे गुरवमध्ये मंडळांच्या भेटीला ते गेले. त्याचवेळी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप तेथे दाखल झाले. हे दोघेही एकाचवेळी आल्यामुळे उपस्थित मंडळी गोंधळात पडली. या दोघांमध्ये येथे कुठलीच राजकीय चर्चा झाली नसली तरी, हे दोघे एकत्र आल्यामुळे पुढची समिकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

मावळची उमेदवारी शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना गेल्याने लक्ष्मण जगताप हे नाराज आहेत. जगताप मावळमधून तीव्र इच्छुक होते, त्यांनी शेवटपर्यंत मतदारसंघ भाजपला सोडवण्यासाठी प्रयत्न केले. तरीही युतीची उमेदवारी मिळविण्यात बारणे यांनी बाजी मारली. नाराज झालेले जगताप व त्यांचा समर्थक गट बारणे यांना मदत करणार नाही. यामध्ये आज पार्थ पवार आणि लक्ष्मण जगताप एकत्र आल्यामुळे वेगळ्याच चचेर्ला तोंड फुटले आहे.यावेळी स्थायी समितीचे सभापती विलास मडेगिरी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे,  नगरसेवकही उपस्थित होते. 

टॅग्स :mavalमावळLakshman Jagtapलक्ष्मण जगतापNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShiv Senaशिवसेना