The BJP gave me thrown away minister department : criticism of Mahadev Jankar | भाजपवाल्यांनी मला टाकून दिलेलं खाते दिलं : महादेव जानकर यांची टीका 
भाजपवाल्यांनी मला टाकून दिलेलं खाते दिलं : महादेव जानकर यांची टीका 

ठळक मुद्देआदर्श शिक्षक आणि शाळा पुरस्कार वितरण समारंभ

पिंपरी :  भाजपवाल्यांनी मला टाकून दिलेलं खात दिलेलं आहे. आपला पक्ष छोटा असल्याने त्यांनी असं केल्याचं पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास महाराष्ट्र राज्यमंत्री महादेव जानकर यांनी आहे. चिंचवडमध्ये आदर्श शिक्षक आणि शाळा पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. 
चिंचवड मधील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कार्यक्रमास महापौर राहुल जाधव,खासदार अमर साबळे,आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त श्रावण हर्डीकर,स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगेरी, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे,शिवसेना गटनेते राहुल कलाटे उपस्थित होते. 
महादेव जानकर म्हणाले  की, माझ्याकडे भाजपावाल्यांली टाकून दिलेलं खात दिले,राष्ट्रीय समाज पक्ष छोटा आहे म्हणून त्यांनी तसं केलं.. तुम्ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्याकडे तशा दृष्टीने पाहू नका.
जानकर म्हणाले  जिल्हा परिषद, महानगर पालिकेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आज अमेरिका, रशिया देश जगावर राज्य करत आहेत. आपल्या येथे गुणवत्ता आहे, मात्र त्याला व्यवस्थित संधी मिळत नाही हे आपले दुर्दैव आहे. किती मुलं महानगर पालिका आणि जिल्हा परिषद शाळेत शिकतात याचे उत्तर नाही.या शाळांवर लक्ष व्यवस्थित दिलं तर उद्याचा दिवस चांगला येईल...


Web Title: The BJP gave me thrown away minister department : criticism of Mahadev Jankar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.