ओव्हरटेक करताना ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील अपघात
By नारायण बडगुजर | Updated: April 16, 2024 17:21 IST2024-04-16T17:20:40+5:302024-04-16T17:21:32+5:30
शिक्रापूर-चाकण रस्त्यावर मोहितेवाडी येथे सोमवारी (दि. १५) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली....

ओव्हरटेक करताना ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील अपघात
पिंपरी : दुचाकीला ओव्हरटेक करताना मागून आलेल्या भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, तर एकजण जखमी झाला. शिक्रापूर-चाकण रस्त्यावर मोहितेवाडी येथे सोमवारी (दि. १५) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
नौशाद अहमद कमरुद्दीन अन्सारी असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मोहम्मद आरफीन अन्सारी (१८, रा. मुंबई) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ट्रकचालक हसनखान सुभान खान पठाण (३१, रा. मादणी डोणगाव, ता. मेहकर) याला पोलिसांनी अटक केली.
मोहम्मद अन्सारी आणि त्यांचे मामा नौशाद दुचाकीवरून चाकण-शिक्रापूर रोडने जात होते. मोहितेवाडी येथे आल्यानंतर पठाण याच्या ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार नौशाद यांचा मृत्यू झाला, तर मोहम्मद अन्सारी जखमी झाले. त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले.