नाल्यातील कचऱ्याला मोठी आग; पिंपरी चिंचवड शाहूनगरमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 18:02 IST2018-01-08T17:58:18+5:302018-01-08T18:02:31+5:30
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यातील कचऱ्याला आज पाच वाजता आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही.

नाल्यातील कचऱ्याला मोठी आग; पिंपरी चिंचवड शाहूनगरमधील प्रकार
चिंचवड : शाहूनगरकडून पूर्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यातील कचऱ्याला आज पाच वाजता आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र नाल्यात मोठ्या प्रमाणात टाकलेल्या कचऱ्यामुळे ही आग पसरत गेली.
या भागात असणाऱ्या झाडांना याचा फटका बसला. रस्त्याच्या बाजूला लागलेल्या या आगीमुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला असल्याने आग इतरत्र पसरत गेली. या आगीत सतत स्फोट झाल्याचा आवाज येत असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून या बाबत पालिका प्रशासनाला गांभीर्य नसल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.