दुचाकीच्या फायरिंगमुळे उरात भरतेय धडकी, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 04:12 AM2018-03-05T04:12:00+5:302018-03-05T04:12:00+5:30

चाकीच्या फायरिंगमधून फटाक्यासारखा फट् फट् असा मोठा आवाज करीत शहरात फिरणा-या हुल्लडबाजांमुळे नागरिकांना अक्षरश: धडकी भरत आहे.

 Bicycle firing by two-wheeler fires, neglect of traffic police | दुचाकीच्या फायरिंगमुळे उरात भरतेय धडकी, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष  

दुचाकीच्या फायरिंगमुळे उरात भरतेय धडकी, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष  

googlenewsNext

पिंपरी - दुचाकीच्या फायरिंगमधून फटाक्यासारखा फट् फट् असा मोठा आवाज करीत शहरात फिरणाºया हुल्लडबाजांमुळे नागरिकांना अक्षरश: धडकी भरत आहे. सायलेन्सरमधून अचानक निघणाºया मोठ्या आवाजामुळे इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कानठळ्या बसविणाºया अशा दुचाकीचालकांवर पोलिसांकडून कारवाई होणार कधी, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

सध्या दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांचा आवाज येणारे यंत्र बसविण्याची पद्धत रूढ झाली आहे. रस्त्यावरून जाताना काही दुचाकीचालकांकडून अचानक जाणीवपूर्वक फटाक्यासारखा मोठा आवाज काढला जातो. यामुळे पादचाºयांसह इतर वाहनचालकही गोंधळतात. एखादा स्फोट झाला असावा, वाहनाचा टायर फुटला असावा अथवा अ‍ॅक्सिडेंट झाला आहे का, अशी भीती मनात भरते. यामुळे सामान्य नागरिकाचे लक्ष विचलित होत आहे. यातून एखादी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुचाकीचालकांचे टोळके एका ठिकाणी जमा होते. त्यानंतर शाळा, महाविद्यालयासह परिसरात फेरफटका मारला जातो. मोठमोठ्याने आरडाओरडा करण्यासह सायलेन्सरचा फटाक्यासारखा आवाज केला जातो. अशा टोळक्यांकडून एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

हृदयविकाराच्या रुग्णांसाठी त्रासदायक
४सायलेन्सरमधून अचानक मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्याने अक्षरश: धडकी भरते. हा मोठा आवाज हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अधिकच त्रासदायक ठरत आहे. मात्र, बेशिस्त वाहनचालकांना कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते.

हृदयविकाराच्या रुग्णांसाठी त्रासदायक
४सायलेन्सरमधून अचानक मोठ्या प्रमाणात आवाज येत असल्याने अक्षरश: धडकी भरते. हा मोठा आवाज हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अधिकच त्रासदायक ठरत आहे. मात्र, बेशिस्त वाहनचालकांना कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येते.

 

Web Title:  Bicycle firing by two-wheeler fires, neglect of traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.