हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाकडी बांबूने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 15:33 IST2019-12-27T15:32:44+5:302019-12-27T15:33:20+5:30
मै तुमको देख लुंगा,अशी दिली धमकी

हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाकडी बांबूने मारहाण
पिंपरी : हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाकडी बांबून मारहाण करून दगड फेकून मारला. यात एकाच्या डोक्याला दुखापत झाली. 'मै तुमको देख लुंगा' अशी धमकीही दिली. काळेवाडी रोड, चिंचवडगाव येथे बुधवारी (दि. 25) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू अण्णासाहेब गुंजाळ (वय 27, रा. काळेवाडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित राजेश लोट (वय 22, केशवनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लोट हा हॉटेल मॅनेजर आहे. फियार्दी गुंजाळ व त्याचा शिवानंद हे दोघे हॉटेलमध्ये गेले असता तेथे बसण्याच्या कारणावरून हॉटेल मॅनेजर आरोपी लोट याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच लाकडी बांबून मारहाण केली. मै तुमको देख लुंगा,अशी धमकी दिली. त्यानंतर दगड फेकून मारला. त्यामुळे फिर्याद गुंजाळ यांच्या डोक्याला दुखापत झाली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.