समजून सांगणाऱ्या मुलीला मारहाण सांगणाऱ्या मुलीला बेदम मारहाण; भोसरीत पित्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 14:24 IST2021-04-08T14:23:22+5:302021-04-08T14:24:03+5:30
आईवर रागावत असलेल्या वडिलांना मुलगी समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती.

समजून सांगणाऱ्या मुलीला मारहाण सांगणाऱ्या मुलीला बेदम मारहाण; भोसरीत पित्यावर गुन्हा दाखल
पिंपरी : आईवर रागावत असलेल्या वडिलांना मुलीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यात वडिलांनी मुलीला व तिच्या आईला मारहाण केली. याप्रकरणी वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्गुरुनगर भोसरी येथे गुरुवारी (दि. ७) सकाळी ही घटना घडली.
सुनील तानाजी पाटील पाटे (वय ५८, रा. सदगुरूनगर, भोसरी), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत आरोपीची मुलगी श्वेता सुनील पाटील पाटे (वय २५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा पिता आहे. तो फिर्यादी यांच्या आईला घरामध्ये गरजेच्या वस्तू आणून देत नव्हता. तसेच फिर्यादी यांच्या आईला घरातून निघून जा, असे म्हणत होता. याबाबत फिर्यादी मुलीने आरोपी पित्याला समजावून सांगत असताना त्याने फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करून फिर्यादीला भिंतीवर ढकलून दिले. त्यानंतर कठड्यावर ढकलून दिले. यामध्ये फिर्यादीच्या ओटीपोटास मुका मार लागून दुखापत झाली. आरोपीने फिर्यादीच्या आईच्या पोटावर देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.