beating and broken tooth because of meeting sister | बहिणीला भेटतो म्हणून पाडला दात
बहिणीला भेटतो म्हणून पाडला दात

पिंपरी : माझ्या बहिणीच्या नावावर जमीन करत नाही तर तू येथे माझ्या बहिणीला का भेटतो आहेस, असे म्हणून दोघांनी मारहाण केली. यात दात पडल्याने एकाला गंभीर दुखापत झाली. वाकड येथे काळाखडक रस्त्यावर मंगळवारी (दि. १०) रात्री सव्वाअराच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली येथील ३२ वर्षीय तरुणाने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वाकड येथील काळाखडक रस्त्यावर थांबलेले असताना आरोपी तेथे आले. माझ्या बहिणीच्या नावे जमीन करत नाही तर तू येथे माझ्या बहिणीला का भेटतो आहेस, असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना दगडाने मारहाण केली. यात गंभीर दुखापत होऊन फिर्यादीचा एक दात पडला. तसेच काठीनेही फिर्यादीच्या पाठीवर मारहाण करून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: beating and broken tooth because of meeting sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.