Pimpri Chinchwad: पत्नीला भेटायला गेलेल्या तरुणाला मारहाण; मेहुणा आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 08:53 IST2024-03-15T08:52:56+5:302024-03-15T08:53:44+5:30
वाकड येथील विशालनगरमध्ये मंगळवारी (दि. १२) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली...

Pimpri Chinchwad: पत्नीला भेटायला गेलेल्या तरुणाला मारहाण; मेहुणा आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी : पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला त्याच्या मेहुण्याने आणि सासऱ्याने मारहाण केली. वाकड येथील विशालनगरमध्ये मंगळवारी (दि. १२) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
आदित्य रजनीकांत मंगरुळे (२६, रा. हडपसर, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्नील तेजराव रणीत (३४), तेजराव रणीत (दोघे रा. वाकड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य यांची पत्नी माहेरी वाकड येथे आली आहे. त्यामुळे ते पत्नीला भेटण्यासाठी जाणार होते. त्यावेळी मेहुणा स्वप्नील याने फोनवर नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आदित्य हे वाकड येथे आले. त्यावेळी मेहुणा स्वप्नील आणि सासरे तेजराव यांनी आदित्य यांना डोळ्यात मिरची पूड टाकून, चाकूने वार करत त्यांना बांबूने कपाळावर व डोक्यावर मारहाण करून जखमी केले.