बहिणीशी फोनवरून बोलल्याने तरुणाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 19:02 IST2020-02-19T19:01:32+5:302020-02-19T19:02:25+5:30

हॉकी स्टिकने व लाथाबुक्क्यांनी मारहाण

Beaten to youth for Talking to sister on phone | बहिणीशी फोनवरून बोलल्याने तरुणाला मारहाण

बहिणीशी फोनवरून बोलल्याने तरुणाला मारहाण

ठळक मुद्देआरोपींविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : बहिणीशी फोनवर बोलल्याच्या कारणावरून तरुणाला तिघांनी हॉकी स्टिकने मारहाण केली. यात तरुण जखमी झाला. लांडेवाडी भोसरी येथे सोमवारी (दि. १७) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
उमेश फुलचंद यादव (वय २४, रा. लांडेवाडी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुनील पुकार यादव (वय २४), प्रदीप पुकार यादव (वय २१), रमेश गोबरी यादव (वय ४०, सर्व रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश हे आरोपी रमेश यादव याच्या बहिणीसोबत फोनवर बोलल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच हॉकी स्टिकने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी उमेश यांच्या डोक्यावर, तोंडावर गंभीर दुखापत झाली. यावेळी उमेश यांना वाचविण्यासाठी आलेल्या इसमांना देखील आरोपींनी हॉकी स्टिकने मारहाण केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Beaten to youth for Talking to sister on phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.